Saleem, Salma and Helan

सलीम, सलमा और हेलन

-
 ‘ग्रेट शो मॅन’ राज कपूर यांची क्लासिक, अजरामर कलाकृती असलेल्या१९५१ सालच्या ‘आवारा’ या चित्रपटाचा रिमेक करायचीमनीषा ‘राज’पुत्र ऋषी कपूर यांनी व्यक्त केली अन् गेल्या आठवड्यात ‘बांगडू’मन ‘आवारा’च्या ‘फ्लॅशबॅक’मध्ये चांगलेच बागडून, हुंदडून आले. ‘आवारा’मध्ये हेलनने भूमिका केली होती’, असा उल्लेख गत आठवड्यातील ‘संदर्भछटा’ मध्ये मी केला होता. या उल्लेखावर अनेक चित्रपट रसिकांचे मला फोन खणखणलेत.‘‘हेलन या चित्रपटात नव्हती...तेव्हा हेलन कशी असेल हो?...एक दोन तीन आजा मौसम है रंगीन...दॅट वॉज कुकू; नॉट हेलन...’’ अशा आशयाचे ते फोन होते. कुकू ‘आवारा’त होती, हे त्यांचे म्हणणे बरोबर होते. मात्र, हेलन या चित्रपटात नव्हती, हे त्यांचे म्हणणे चूक होते. ‘आवारा’च्या स्टार कास्टमध्ये हेलनचे नाव आहे. मात्र, चित्रपटात ती कुठे झळकत नाही. याचे उलगडलेले गुपित असे की, ‘आवारा’मध्ये हेलन होती, पण सोलो डान्सर म्हणून नव्हे; तर कोरस डान्सर म्हणून! नर्तकींच्या समूहात हेलन होती व तिला हे काम कुकूनेच मिळवून दिले होते. आवारात नर्तकींच्या समूहात हेलनला घेण्यासाठी कुकूनेच नृत्यदिग्दर्शक बद्रीप्रसाद यांच्याकडे तिच्या नावाची शिफारस केली होती. याच कालावधीत हेलनने मणिपुरी, भरतनाट्यम् कथ्थक यासारख्या शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. मांजरीसारखे डोळे, पसरट हास्य आणि अतिशय लवचिकपणे, सळसळत्या अंगाने खास शैलीतले, बिनधास्त नृत्य...अशी हेलनची खासियत राहिली. पाच दशकांच्या लंऽऽब्या सिनेकारकिर्दीत हेलनने तब्बल पाचशेपेक्षा जास्त चित्रपटांतून भूमिका केलेल्या आहेत. हेलनचे मूळ नाव हेलन रिचर्डसन अर्थात ख्रिश्‍चन! जन्माने म्यानमारची असलेली हेलन दुसर्‍या महायुद्धाच्या काळात भारतात आली होती. तेव्हा तिची आर्थिक स्थिती हलाखीची होती अन् आई साधी नर्स होती. पैशाअभावी तिला शिक्षण सोडावे लागले होते. मात्र, नृत्याची तिला आवड होती. ५८ साली ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातील ‘मेरा नाम चिन चिन चू’ या गाण्यावरील नृत्याने हेलनला मोठी प्रसिद्धी लाभली‘ओ हसीना जुल्फोंवाली जाने जहॉं...’या नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझिल’ या रहस्यपटामधील गीतावर शम्मीकपूर सोबत हेलनने सुंदर नृत्य केले होते. या गाण्यात ‘रॉकी द बॅण्ड’ वाला ड्रमसेट वाजविणारा जो अभिनेता दिसतो; तो दुसरा तिसरा कुणीच नाही; तर सलिम खान आहेत.
 ६० च्या दशकात ‘सेक्स सिम्बॉल’चे बिरुद मिळविलेल्या हेलनच्या मादक गीतावरच्या नृत्याचे लाखो चाहते तेव्हाही होते अन् आजही आहेत. हेलनचे आशा भोसले-आर. डी. बर्मन यांच्याशी अनोखे कॉम्बिनेशन राहिले आहे. आशाताईंच्या गाण्यांवर हेलनचे नृत्य प्रत्येकवेळी हिट ठरलेले आहे. ‘कारवॉं’तील ‘पिया तू अब तो आजा...,’ ‘इन्कार’मधील उषा मंगेशकरांच्या गाजलेल्या ‘तूऽऽ मुंगळा मुंगळा, मै गुड की डली...’ही गीतं हेलनच्या नृत्यांमुळेच आजही तितकीच नशेबाज आहेत. आजही लग्नाच्या बॅण्डमध्ये मोठ्या धडाक्यात हे गाणे जेव्हा वाजवले जाते तेव्हा बुढ्ढा असो वा जवान, सर्वांची एनर्जी नृत्यात ओसंडून वाहते.
 हेलनची कहानी... सिनेसृष्टीतील तिचा संघर्ष... यशापयशाचा आलेख... एकापेक्षा एक सरस नृत्याविष्काराने गाजलेली तिची गाणी... वैवाहिक जीवनात आलेली वादळं... एकटी पडल्यानंतर सलीम यांच्याशी सुरू झालेली प्रेमकहानी... विवाहित सलिम यांच्याशी लग्न... यानंतर सलीम यांच्या कुटुंबात मिळालेले मानाचे स्थान...अन शेवटी हॅप्पी मॅरिड लाईफ... आदी सर्व थक्क करणारेच आहे.
 हेलनचे पहिले लग्न१९५७ साली बॉलीवूड दिग्दर्शक प्रेम नारायण अर्थात पी. एन. अरोरा यांच्याशी झाले होते. ‘दिल दौलत दुनिया’,‘सिंदबाद अलिबाबा ऍण्ड अलाद्दिन’,‘खजांची’, ‘नीलोफर’, ‘हूर-ए-अरब’, ‘चोर बाजार’, ‘रेल का डिब्बा’ या सात चित्रपटांचे दिग्दर्शन, तर ‘दिल दौलत दुनिया’, ‘खजांची’,‘लैला मजनू’,‘पारस’ या चार चित्रपटांची निर्मिती अरोरा यांनी केली होती. अरोरा हे हेलनपेक्षा वयाने खूप मोठे होते. अरोरांचा जन्म १२ जून १९१२ रोजी पाकिस्तानमधील क्वेट्टाचा, तर हेलनचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ चा! म्हणजे दोघांमध्ये तब्बल २७ वर्षांचे अंतर होते. ‘मै का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया...’ ही फिल्मी सिच्युएशन येथे तंतोतंत जुळणारी होती. मात्र, ‘पीरेमाची ब्येमारी’ लागलेल्यांना म्हणजेच प्रेमाच्या भूतानं झपाटून टाकलेल्यांना, जात, पात, वय, कामधाम यांच्याशी काहीही देणे-घेणे नसते, हे त्यांच्याशी शुद्ध बकवास असते. प्रेमरोगाने पछाडलेले हेलन-पी. एन. अरोरा हे देखील मग त्याला अपवाद कसे राहणार? प्रेमात त्यांचीही अवस्था ‘इश्काची इंगळी डसल्यावानी’ म्हणजे ‘ब्येमारू’ अशीच झाली होती. या दोघांचे लग्न झाले. अरोरा यांच्याशी काही वर्षे सुरळीत चालल्यानंतर अर्थात आकर्षणाचे पॉलिश उडल्यानंतर दोघांमध्ये खटके उडायला लागलेत. १७ वर्षांच्या संसारानंतर हेलनने १९७४ साली अरोरा यांना घटस्फोट दिला. यानंतर हेलनची अवस्था दिवाळखोरीसारखी झाली होती. तिच्याकडे तेव्हा ना पैसा उरला होता ना काम! अशा स्थितीत तिला आधाराची गरज होती. ‘तशी आधाराची गरज प्रत्येकालाच असते... आपली मान कुणाच्या तरी खांद्यावर ठेवून भावूक होण्यासाठी...रडण्यासाठी!’हेलनही याला अपवाद नव्हती, तिलाही आधाराची गरज होतीच. परंतु वाईट दिवसांत बॉलीवूडचा एकही बंदा तिच्या मदतीला पुढे आला नाही. फक्त एका व्यक्तीने तिला आधार दिला. ती व्यक्ती होती लेखक-पटकथाकार सलीम खान! सलिम हे इंदूरहून १९५८ साली अभिनेता बनण्यासाठी मुंबईला आले होते. हेलनशी त्यांची पहिली भेट १९६३ साली ‘काबली खान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या भेटीच्या वेळी हेलन ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून नावारूपास होती व ती प्रगतीचे उंच झोके घेत होती, तर सलीम हे फ्लॉप अभिनेते होते. तेव्हा ‘स्ट्रगलर’ म्हणूनच त्यांचा प्रवास सुरू होता. पहिल्या भेटीतच सलीम हेलनच्या प्रेमात पडले होते. मात्र, हेलनच्या मनात होते चित्रपट निर्माते-दिग्दर्शक पी. एन. अरोरा! अरोरा हेदेखील हेलनच्या सौंदर्याच्या भुरळात दिवाने बनले होते. अरोरा यांनी आपल्या सात चित्रपटांमध्ये हेलनला घेतले होते, यावरून हेलनवर ते किती जीव ओवाळून टाकत होते, याची प्रचीती येते. ‘हेलनच्या मनात अरोरा आहे आणि त्यांचा जांगडबुत्ता पक्क्यात आहे,’ हे सलीम यांना समजल्यानंतर त्यांच्या एकतर्फी प्रेमाचा भंग झाला व त्यांनी स्वत:च्या मनाची समजूत स्वत:च काढली. यानंतर १९५९ साली सलिम खान यांना सुशीला चरक नामक अतिशय देखण्या व लाजाळू युवतीवर प्रेम जडले. सुशीला ही हिंदू म्हणजे महाराष्ट्रीयन राजपूत होती, तर सलीम हेदेखील देखणेच होते व त्यातही ते चांगल्या स्वभावाचे होते. त्यामुळे दोघांचीही मनं जुळली. तब्बल पाच वर्षे ते सुशीलाला ‘चुपके चुपके’ भेटत राहिले. यानंतर सलीम यांनी सुशीलाशी लग्न करण्याचा निर्धार केला व कुटुंबीयांना आपली इच्छा सांगितली. मात्र, सलीम यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनी कडाडून विरोध केला. सलिम यांनी हा विरोध झुगारून सुशीलासोबत १९६४ साली लग्न केले. मुस्लिम माणसाशी लग्न केल्याने महाराष्ट्रीयन सुशीला मग बेगम सलमा बनली. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. लग्नानंतर त्यांना सलमान, अरबाझ, सोहेल ही तीन मुले आणि अल्वीरा ही मुलगी झाली. आज ही तीनही मुले चित्रपटसृष्टी गाजवत आहेत, तर अल्वीरा ही अभिनेता-निर्माता दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री याची पत्नी आहे. अतुल अग्निहोत्री हा ‘क्रांतिवीर’मध्ये नाना पाटेकरचा भाऊ म्हणून चमकला होता.
 सलीम-सलमा यांचा सुखाचा संसार सुरू असताना तिकडे हेलन-अरोरा यांच्या संसारात खटके उडत होते. हेलनला अरोरा हे खूप त्रास देत होते. पुढे तिची कमाईच ते उडवत होते. तिच्यावर अनेक निर्बंध अरोरा यांनी लादले होते. मोकळा श्‍वास घेण्यासाठी तिने अरोरा यांना घटस्फोट दिला. १७ वर्षे संसार केल्यानंतर अरोरांना घटस्फोट दिला तेव्हा हेलनकडे ना पैसा होता ना काम! ती पूर्णत: कोलमडून गेली होती. तिच्या वाईट दिवसांमध्ये तिला सलिम यांनी मदतीचा हात दिला. तेव्हा अभिनय सोडून पटकथा लेखक बनलेले सलीम यांची लेखणी धारदार होती. पार्टनर जावेद अख्तर यांच्यासमवेत त्यांनी १८ चित्रपट कथा तेव्हा लिहिलेल्या होत्या. अनेक निर्मात्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. सलीम यांनी अनेक चित्रपटांमध्ये हेलनला काम मिळवून दिले. सलीम यांनी केलेली शिफारस तेव्हा कुणीच टाळत नव्हते, एवढे वजन तेव्हा सलिम यांचे होते. ‘जंजीर’, ‘शोले’,‘डॉन’ यासारख्या हिट चित्रपटांत हेलनला भूमिका सलीम यांच्यामुळेच मिळाल्या. यानंतर सलीम-हेलन यांच्या भेटीगाठी खूप वाढल्या. ते जास्तीत जास्त वेळ हेलनला देऊ लागले होते. हेलनच्या प्रेमात ते पडले होते. हेलनच्या पुन्हा प्रेमात कधी पडलो, याचा पत्ताच त्यांना लागला नाही. ते रात्री उशिरा आपल्या घरी परतायचे. सलमा त्यांची रात्री उशिरापर्यंत वाट पहात राहायची. सलमान, अरबाज, सोहेल हे तिघेही तेव्हा आईची अवस्था पाहात होते. तेव्हा त्यांना ‘काय सुरू आहे’, एवढी समज निश्‍चितच आली होती. सलीम उशीर होण्यामागचे कारण सांगत नव्हते. अनेक दिवस हा कार्यक्रम सुरू राहिल्यानंतर सलीम यांनी हेलनसोबतच्या बेनाम नात्याला नाव देण्याचा निर्धार केला. त्यांनी सुशीलाला जे ़खरे आहे, ते सर्व सांगून टाकले व ‘हेलनसोबत मला लग्न करायचे आहे,’ हा निर्धारही बोलून दाखविला. हे ऐकताच सलमासह संपूर्ण कुटुंबच हादरले, तिने विरोध केला. मात्र, सलीम हे आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्या निर्णयापुढे कुणाचेच काही चालले नाही. मात्र, हेलन यांच्याशी लग्नाचा निर्णय घेताना त्यांचे दुसरे मन त्यांना खात होते. ‘हेलनशी लग्न करून आपण सलमावर अन्याय करीत आहोत,’ ही अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात होतीच. त्यांची ही मनोवस्था शेवटी सलमा यांनीच हेरली व तिने धक्कादायक निर्णय घेताना हेलनशी लग्न करण्याची संमती सलीम यांना दिली. मुलांचीही समजूत काढण्याचे काम तिनेच केले. अखेर ८१ साली सलिम-हेलन यांचे लग्न झाले. लग्नानंतर सलमानेच हेलनला स्वत:च्या घरात स्थान देऊन पुन्हा मनाचा मोठेपणा दाखवला. प्रारंभी हेलनला काही दिवस कठीण गेलेत. नंतर मात्र सलमामुळेच तिला मानाचे स्थान मिळाले. सलमाने तिला सांभाळून घेतले. सलमान, अरबाज, सोहेल, अल्वीरा यांनीही हेलनला आई म्हणून स्वीकारले. आजही हे कुटुंब एकत्रितपणे मोठ्या आनंदाने राहात आहे. ‘दोन बायका फजिती ऐका’ अशी वेळ सलिम यांच्यावर कधीच आली नाही. लग्नानंतर हेलन-सलीम या दाम्पत्याने ‘अर्पिता’ ही मुलगी दत्तक घेतली. अर्पिता ही आज २३ वर्षांची झाली आहे. सलीम हे सलमा, हेलन, मुले यांच्यासोबत एकोप्याने राहाताहेत्. सलमा-हेलन यांचेही एकमेकींशी चांगले टयुनिंग आहे. विशेष म्हणजे, आपल्या बहारदार नृत्यांनी, अदांनी, अभिनयाने बॉलीवूडचा रुपेरी पडदा पाच दशके गाजविल्याबद्दल १९९८ साली हेलनचा ‘फिल्मफेअर’ने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. हा पुरस्कार तेव्हा हेलन यांना सलमान, अरबाज, सोहेल यांच्याच हस्ते दिला गेला होता, हा देखील मोठा योगायोगच होता. ‘‘हेलनसारखी सुंदर आई आम्हाला लाभली. आम्हाला दोन आई आहेत, हे आमचे सौभाग्यच आहे,’’ अशी प्रतिक्रिया सलमानने तेव्हा व्यक्त केली होती. सलमान-हेलन या मायलेकांनी ‘खामोशी’ ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटांत सोबत काम केले होते. हे दोन्ही चित्रपट हिट झाले होते. ‘सलमानच्या घरी गणपती महोत्सव मोठ्या भक्तिभावाने का साजरा होतो,’ याचे गुपित याच कौटुंबिक कथेत दडलेले आहे. सलीम यांचे कुटुंब खर्‍या अर्थाने धार्मिक सलोख्याचे कुटंंुंब म्हणावे लागेल. हेलन ही मूळची ख्रिश्‍चन, सलमा ही पूर्वाश्रमीची महाराष्ट्रीयन हिंदू, तर सलीम हे मुस्लिम! सलीम यांचा मधला मुलगा अरबाजने मलाईका अरोरा या पंजाबी अभिनेत्रीशी लग्न केलेले आहे, मलाईकाचे ‘चल छय्याऽ छय्याऽ छय्याऽऽ छय्याऽऽ... हे गाण्यावरील नृत्य गाजले होते, नंतर ‘दबंग’मध्ये तिच्या ‘मै झंडू बाम हुयी’ने तर तरुणाईला तर अक्षरश: ठार वेडेच करुन टाकले होते. तिकडे अल्वीराचा पती अतुल अग्निहोत्री हा हिंदू आहे. बोला, आहे ना फिल्मीस्टाईल ड्रामा सलीम खान यांच्या कुटुंबात? बॉलीवूडमध्ये कपूर घराणे, बच्चन घराणे, देओल घराणे यांच्याप्रमाणेच सलीम खान कुटुंबदेखील एक मोठे फिल्मी कुटुंब आहे. सलीम, सलमा आणि हेलनची कहानी हा मोठा फिल्मी ड्रामाच जरी असला, तरी ‘हम साथ साथ है’ चा संदेश देणारे ते आदर्श कुटुंबच म्हटले पाहिजे.

Salim, Salma and Helen

-

  "Great Man Show 'classic of Raj Kapoor, famed artwork asalelya1951 year's maverick film remake karayacimanisa' rajaputra Rishi Kapoor expressed Anwar last week bangadumana 'avara of phlesabeka in good bagaduna, or a ginger . 'Avara was in the role of Helen', mentioned last week that "sandarbhachata 'I was in. Movies denied me the phone number on the note khanakhanaleta. '' The film was Helen Helen ... then how will you? ... That ... Was a two or three night season, colored cuckoo; Not Helen ... '' denying that they were on the phone. Kuku 'avarata was, it was just their voice. However, Helen was not in the film, they say it was wrong. 'Is the name of the star cast in avara Helen. However, where the film was not having it. It's no secret that point, avara Helen was in, but not as a solo dancer; If the chorus as a dancer! Nartakim the group who won the kukuneca her work and Helen. Badriprasad the name was recommended to her choreographer Helen kukuneca group nartakim premises. In the same period, Helen Manipuri, Kathak Bharatnatyam like taking lessons in classical dance. Cats eyes, smile and very flexible leads, the third best selling salasalatya itself, seductive dance ... what specialty to Helen. Five decades of lambya sinekarakirdita Helen movies are playing more than five hundred nine. The original name of the Christian Helen Helen Richardson course! Helen was born in Myanmar, India during World War II. And when her mother was a simple economic status sordid nurse. Paisaabhavi the release of her education. However, the dance was her passion. 58 in 'Howrah Bridge' film 'Mera naam Chin Chin Chu "or where to go ganyavarila dance Helen big publicity labhalio Hasina julphonvali ...' or Nasir Hussain's' third manjhila this rahasyapatamadhila Gita on sammikapura with Helen had a beautiful dance . The song "Rocky the band with dramaseta vajavinara actor who arrives; It does not do second, third; Prices are crazy.

  60 of the Decade 'sex simbolace are still succeeded only marginally when Anwar was like millions of sexy dance gitavara Helen gained. Asha Bhosle-Helen R. D. Berman has remained with the unique combination. Asataim of the songs on the dance Helen is fixed every hit. 'Karavomtila' Piya Tu Ab To Aaja ... 'inkaramadhila Usha Mangeshkar's famous' Why ant ant, I ... Good piece of' the addict gitam Helen nrtyammuleca are still the same. Even today, whether young or old, when the wedding band when this song is played in a large dhadakyata, all energy flows bubbling dance.

  The story of her struggle ... yasapayasaca article ... Helen ... sinesrstitila more than one glue nrtyaviskarane large group of her songs ... vadalam been married life ... alone after the start of the romance ... Salim Salim is married with a wife ... and Salim's family finally received a respectable place ... un ... Happy merida Life is like all amazed karanareca.

  Helen first lagna1957 in Bollywood director Prem Narain course p. N. Aurora was with. Dil Daulat the world, '' Sinbad alibaba and aladdina ',' cashier ',' nelofar ',' Arab-e-Hur ',' black market ',' rail wagon 'directed seven films, while' Dil Daulat world ''cashier', 'Laila majnu', 'Paras' aurora had produced four movies. Aurora was too young than Helen. Aroranca born kvettaca Pakistan on June 12, 1912, but Helen was born November 21, 1939 of! The difference between the total of 27 years. "I was not old ... I've got the Ram 'was precisely here that matches the film sicyuesana. However, piremaci byemari 'lagalelyanna the passion of love bhutanam takalelyanna, caste, creed, age, would not take anything with kamadhama-payment, it is pure nonsense to them. Premarogane haunted Helen-P. N. Aurora will also then how does he? Love they state 'iskaci Ingle dasalyavani' means' byemaru had been so. The two got married. Aurora happens after the smooth polished udalya after a few years of attraction between freely Sounds possessed. Helen divorced after 17 years of marriage to Aurora in 1974. And Helen phase was divalakhorisarakhi. Do not work when the money was left to her! In this case she needed the support. "Your honor, as is everyone in need of support ... to ... to cry on someone's shoulder, keeping requirement!" Helen was the only exception, she also need support. Bollywood but no guy came forward to help her bad days. But the rest of her person. That person was the author-scriptwriter Salim Khan! Salim was the Indore to Mumbai to become an actor in 1958. Helen their first visit in 1963 "bolt Khan film was set on. At the time of this visit Helen 'Dancing Queen' was identified as tall and she was taking a swing of progress, but the actor Salim this flop. Therefore stragalara 'That was the start of their journey. Fell in love with the first bhetitaca Salim Helen. However, it was film producer-director Helen P. N. Aurora! Aurora also became Helen's beauty bhuralata lamp. Mr Helen was taken in seven films, from the fact that Helen was going to ovaluna much life, that is what happens. "Helen's heart Arora and their pakkyata jangadabutta," Salim said there was a breach and understood their one-sided love their own mind, understanding themselves out. Sushila Charak in 1959 and named Salim Khan who is very picturesque and shy young love her. Susheela is a Hindu Maharashtrian Rajputs, even if Salim had dekhaneca and there they were good nature. The match both minds. Nearly five years to susilala 'Chupke Chupke' remained meet. Salim and his family had decided to get married susilasi and told him his wish. However, Salim's decision was opposed by their family. Salim said the opposition defied susilasobata married in 1964. By Maharashtrian married a Muslim man and Begum Salma became Sushila. Both were in love with each other much. After marriage they Salman, Sohail, Arbaaz and Alvira was the daughter of three children. Today, there are three children dominate the film, but Alvira is the wife of the actor-producer-director Atul Agnihotri. Atul Agnihotri is a krantivira was fired as a brother Nana Patekar.

  While Salim and Salma-millennium world-Aurora Helen's really starting there I was molested. Helen Aurora was not very good. Next to her was a mockery kamaica. Many of the restrictions were imposed on her, Aurora. To free the breath she gave away to Aurora. Helanakade not work when the money was not divorced after 17 years aroranna world! Completely went for a toss. Salim said her bad days she gave a helping hand. When was the sharp style of acting out the script writer Salim made. They were written when the film is the story of 18 partners, along with Javed Akhtar. Makers had a good relationship with many of them. Saleem Helen gave a work in many films. And nobody could avoid Recommended by Salim, Salim and so was the weight. 'Chain', 'Sholay', 'Don' hit films such as the role of Helen Salim yancyamuleca received. And Salim-Helen's done it before, too. They were offered very little Helen. Helen fell in love with it. Helen never fell in love again, this was not Submitted them. They should go back to his house late at night. Salma want to wait until the night. Salman, Arbaaz, Sohail was looking stage mother and three. When they do start, so there was definitely a sense. Salim was late for telling honyamagace. After several days of starting this program I know of Salim had decided to name the unnameable relationship. He is khare which susilala, they cast her and I know you want to marry me, 'This is not shown by words alone. This salamasaha keep the whole family shaken, she resisted. However, Salim was silent. Not going to some of their nirnayapudhe complain. However, the decisions were eating their second marriage with Helen mind. "You're not wrong by Salma married Helen, this guilt based on their mind. She said the mood at the end of the Salim and Salma himself Harel consent to marry Helen while shocking decision. Sons and BSP job of picking understanding. In the last 81-Salim Helen was married. After marriage salamaneca Helen's own mind again shown by the amplitude space in the house. Helen initially hard for a few days. But then she salamamuleca respectable place. Salma grown up with her. Salman, Arbaaz, Sohail, Alvira also accepted as the mother of Helen. Today the family is living together with great joy. Hear the opportunity wives' time was not even on Salim. After the wedding, Helen-Salim couple 'Arpita' adopted daughter. Arpita today is 23 years old. This Salma Salim, Helen, and children with ekopyane rahatahet. Salma Helen-tuning is also far better. Interestingly, our scenic nrtyanni, adanni, acting Bollywood silver screen in 1998, five decades gajavilyabaddala Helen 'philmaphearane be awarded the Lifetime Achievement Award. This award when Helen and Salman, Arbaaz, Sohail was in his hands, he went, there was also a great paying gig. '' Helanasarakhi given us beautiful. We are a mother of two, this is our saubhagyaca, '"said Salman had then. Salman Helen or mayalekanni 'silence' 'We Dil De Chuke Sanam' worked with the films. It was a hit in both films. Salman's house Ganpati festival is celebrated with great used to religiously watch, "This is the secret of the hidden story of the family. Salim's family will say kutammumba real sense of spiritual peace. The Reset Helen Christian, Hindu Maharashtrian Salma these nee, but Salim is a Muslim! Salim's middle son is married to Arbaaz malaika arora or Punjabi actress, malaikace 'variable chayya chayya chayya chayya ... ganyavarila was born to dance, then dabanga in her' I zandu balm huyine If youth but literally killed vedeca and was cast. There alviraca husband Atul Agnihotri is Hindu. Talk is not philmistaila Drama Salim Khan's family? Bollywood Kapoor house, Bachchan house, house yancyapramaneca Salim Khan kutumbadekhila Deol family is a great film. Salim, though the story is a great film dramaca Salma and Helen, though, is with us, "said the message that they should be the ideal family.

No comments:

Post a Comment