Pori Jara Japun

पोरी जरा जपून

‘पोरी जरा हळू हळू हळू चाल’ हे अवधूत गुप्तेंचे गीत कानावर पडले आणि मन नकळत, आजची तरुण पिढी आणि पूर्वीची तरुण पिढी यात तुलना करू लागले.
 मुलींच्या आई-वडिलांना ‘कांदे-पोह्यांचे’ बरेचसे कार्यक्रम पार पडल्यानंतर मुलाकडून होकार मिळायचा. ‘पसंती’चा संदेश वडील हवेवर तरंगत येऊन कुटुंबात जाहीर करायचे. ‘लग्न म्हणजे तडजोड’ हे समीकरण ठरलेले असायचे. ‘मुलाचे सौंदर्य नव्हे, त्याचे कर्तृत्व महत्त्वाचे,’ असा मंत्र जपत नववधू, पालकांनी निवडलेल्या मुलाच्या म्हणजे जावयाच्या गळ्यात हार घालून सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घ्यायची. कारण, तिला लग्न जवळजवळ पक्के झाल्यावर औपचारिकता म्हणून ‘मुलगा पसंत आहे का?’ हे विचारले जायचे. आई-वडिलांवरील गाढ विश्‍वासामुळे तिचा होकार ठरलेला असायचा. लग्नाचे ‘रौप्यमहोत्सवी वर्ष’ त्यांची मुलं दणक्यात साजरे करायचे. कारण, स्त्रीसुलभ लज्जा, नम्रता, तडजोड, समायोजन आणि त्याग या गुणांची ती मूर्तिमंत उदाहरण असल्याने संसारात खटके कधी उडूच द्यायची नाही.खटके उडण्याची वेळ आली की, आपल्याकडे कमीपणा घेऊन, आलेला क्षण साजरा करण्याचे तंत्र ती कुशलतेने हाताळायची. संसाररूपी विद्यापीठाच्या चांगली सून, चांगली पत्नी, चांगली आई या पदव्या चढत्या क्रमाने प्राप्त करायची आणि सर्वोच्च समजली जाणारी सासूची पदवी तिच्या शिरपेचात खोवली जायची. ही तर नाण्याची एक बाजू.
 दुसरी बाजू म्हणजे आजची तरुण पिढी. बहुतेक आई-वडिलांना मुला-मुलींसाठी स्थळ बघण्याचा प्रसंगच येऊ देत नाही. कारण, आजचे उच्चविद्याविभूषित मुलं-मुली शिक्षणाच्या,सेमिनारच्या आणि प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्यात मैत्रीची वीण विणली जाते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले आणि लग्नाच्या आणाभाका कधी घेतल्या गेल्या, हे त्यांना कळतदेखील नाही.
 आई-वडिलांनी विरोध करायचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कारण, आजची तरुण पिढी फक्त परवानगी मागत नाही,तर ठणकावून सांगते- ‘‘माझं आणि तिचं प्रेम आहे आणि अमुक अमुक तारखेला आंतरजातीय विवाह करणार आहोत.’’पालकांचा आंतरजातीय विवाहालादेखील विरोध नसतो.कारण,मानवता हा एकच धर्म पाळायचा असेल, तर जातीच्या या भिंती नष्ट व्हायला हव्यात. परंतु, प्रोजेक्ट आणि सेमिनारच्या निमित्ताने एकत्र येऊन लगेच लग्न करण्यापर्यंत मजल जाणे योग्य नाही.दोघांच्या आवडीनिवडी, कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती याचा कसलाही विचार न करता जिन्स टॉप आणि मिनी स्कर्ट घालणारी सून घरात आणली जाते. नव्याची नवलाई संपली की, छोट्या छोट्या गोष्टीतून भांडणाला सुरुवात होते आणि अजाणता वयात केलेले प्रेम फक्त आकर्षण असतं, हे संसाराची धग लागल्यावर कळण्यात अर्थ नसतो.
 आजच्या काळात मुला-मुलींना शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीनिमित्ताने एकत्र येणे आवश्यक नव्हे, तर अपरिहार्य आहे. हे १०० टक्के खरे असले, तरी मुलींनी आपली नम्रता, शालीनता, मार्दव जपलेच पाहिजे. काळाची आणि परिस्थितीची गरज म्हणून जिन्स, मिनी स्कर्ट ठीक,पण अंगभर पंजाबी ड्रेस आणि साडी यात स्त्री जितकी खुलून दिसते ती अशा तोकड्या कपड्यांत नव्हे.आपण परिधान करीत असलेल्या पोशाखाचा एक वेगळाच फिल आपल्याला जाणवत असतो.आपला वेगळा ठसा आपण समाजात उमटवीत असतो, याची तोकडे कपडे घालणार्‍या तरुणींना कल्पना नसते.
 त्यामुळेच आकर्षणातून केले गेलेले विवाह चिरकाल टिकणारे नसतात. तू-तू, मैं-मैं होऊन अखेर ते तुटतात. ते केवळ वळवावरचे पाणीच ठरते.

"Slowly, slowly move a little kid, there avadhuta guptence heard the song and fell unaware mind, today's young generation and the young generation as they compare to this.

  Girl and mother-father 'onions-pohyance' yes' d child after crossing many programs. 'Pasantica message to his father's family came to a meeting should be announced on. "Marriage compromise 'it, it was fixed equation. "Not a child's beauty, its important achievements," bride movie that mantra, along with the birth parents want anabhaka staying seven and lost the neck of the selected child is javaya. Because of this, she married almost a formality, as confirmed after 'is like a son?' Asked to go there. I used to be fixed, yes-vadilanvarila her deep faith. Marriage 'silver jubilee year to celebrate danakyata their children. Because, womanly modesty, humility, compromise, adjustment and sacrifice that personify the qualities that really freely example, when the time came to uduca nahikhatake effort, took degrading, which has been observed time and efficient method to handle. Sansararupi a good daughter-in-law of the University, a good wife, a good mother to get in the ascending order of the titles and the highest degree of law considered to go khovali sirapecata her. If the tails side.

  The second phase of the younger generation today. Most of the girls in the place of the mother-son-way prasangaca does not occur. For today's girls-boys done better education, are seminars and projects come together on the occasion of their friendship and mating vinali. I love it when it was transformed into friendship and marriage ever took anabhaka past, this is not kalatadekhila.

  There is no question to question parents. For today's young generation just do not ask permission, but feeling sangate '' I love her and are going to marriage and whether such date. '' Parental caste vivahaladekhila question nasatokarana, humanity will be the only religion ordinance, but this breed Thus, we have destroyed the walls. However, the project came together on the occasion of the seminar and interests nahidogham the right to stage karanyaparyanta married immediately, family situation, without any thought to contribute to the economic situation in jeans top and mini skirt is brought into law. Out of the wonders of his own, small gostituna gathered for war and the beginning of love is the only attraction at ajanata, there were not significant enough to face the ire of the stage.

  On the occasion of the girls-child education today, nokarinimittane not need to meet, but it is inevitable. This is 100 percent true, when your daughters humility, decency, humanity should japaleca. Black and jeans as needed with the situation, mini skirt, fine, but foot Punjabi dress and showing another woman in sari dress asatoapala feel you're wearing a different Phil navheapana Clothing publish such as the one that looks like a colored umatavita society, that delicious girls clothes no idea innovation.

  That is not lasting forever been married akarsanatuna. You-you, I-I in the end they tutatata. It is only valavavarace water.

  So tell you that, "Kid, just careful."

  "You phulaphulantila humanity, manamanantila plead for you.

  Sugandhapari chefs, gharadarala recovers.

  You devatvaci Idol. '
 म्हणून सांगावेसे वाटते, ‘पोरी जरा जपून.’
 ‘फुलाफुलांतील मार्दव तू, मनामनांतील आर्जव तू.
 सुगंधापरी बावरशी, घरदाराला सावरशी.
 तू देवत्वाची मूर्ती.’

No comments:

Post a Comment