Relationship Status: Separated

रीलेशनशिप स्टेटस् : सेपरेटेड

-
सारिका आणि अश्‍विन; तसं साजेसं जोडपं. २ वर्षांपूर्वी त्यांनीच एकमेकांना पसंत करून लग्नाचा निर्णय घेतला. सारिका एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगारावर नोकरीला होती, स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणारी सारिका आणि अमेरिका रिटर्न पण सालस आणि सरळ अश्‍विन. अश्‍विन मात्र मम्माज बॉय म्हणावा असाच होता.
 दोघेही लग्नाच्या मंगल बंधनात अडकले. त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडील सुद्धा एका नव्या नात्यात जोडल्या गेले. लग्नानंतर दोघेही आपापल्या कामावर रुजू झालेत. सारिकाला फक्त करीअर आणि आपला राजा-राणीचा संसार हवा होता, पण अश्‍विनला मात्र आपला संपूर्ण परिवार सारिकासकट हवा होता;आणि हेच कारण होते ज्यामुळे त्यांच्या संसारात तडा निर्माण झाला. २ वर्षात ना मूल ना घर, झाले ते फक्त वाद विवाद. आणि मग उपाय सुचला तो घटस्फोटाचा!!!
 नाती तुटली, नवरा आणि बायकोच नाही तर दोन्ही परिवार तुटले. लग्न करतेवेळी घेतलेली वचनं पुसल्या गेलीत.गळ्यातील मंगळसूत्राचा संदर्भ बदलला, सासू सासरे वैरी आणि नवरा फसवेखोर माणूस झाला!!!
 आणि आजपर्यंत ज्या फेसबुक प्रोफाईलवर दोघांचे सोबत फोटो असायचेत त्याच फेसबुकवर रीलेशनशिप स्टेटस् झाले सेपरेटेड. पण खरंच फेसबुकवर स्टेटस् बदलल्याने किंवा दोन कागदांवर सह्या केल्याने लग्नाचं नातं तुटू शकतं का?
 लग्न! प्रेमविवाह असो किंवा आईवडिलांच्या पसंतीने केलेले, ते फक्त दोन जिवांचं आणि शरीराचं मिलन नसतं तर ते मिलन असतं दोन परिवारांचं, दोन संस्कृतींचं आणि असंख्य नव्या नात्याचं आणि एक कागद; ज्यावर नवरा-बायको सही करतात आणि सगळ्या नात्यांना तिलांजली दिली जाते. पण खरंच हा एक कागद सगळ्या भावनांना नष्ट करायला समर्थ आहे का? का काही वादविवादांचे रूपांतर नात्यांना तोडणार्‍या निर्णयांमध्ये होते?
 दोन जीव जेव्हा एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांना जेव्हा स्वीकारतात, तेव्हा ते एकमेकांच्या परिवारालासुद्धा स्वीकारतात. एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांच्या चुकांसकट स्वीकारतात. मग कालांतराने या सगळ्या गोतावळ्याचा का कंटाळ येतो? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे शोधणे आणि मिळवणे ही काळाची गरज बनत चालली आहे. लग्न अपयशी होणं यामागे कारणीभूत फक्त नवरा किंवा बायको नसते, तर दोन्ही परिवार सुद्धा याला कारणीभूत असतात.
 मुलीने का आपल्या नवर्‍याच्या आई-वडिलांना सांभाळू नये? शेवटी तो नवराही तुम्हाला त्यांनीच दिला असतो ना! आणि सारखेच गणित हे मुलाच्या बाबतीत सुद्धा आहे. पण प्रश्‍न तेव्हा निर्माण होतात जेव्हा या सगळ्यांमध्ये अहं भाव डोकावू लागतो. मुलीचं कर्तव्य असतं सासू सासर्‍यांची सेवा. मग मुलाचं का नाही? प्रत्येक वेळी मीच का? हे प्रश्‍न जेव्हा मुलीच्या मनात घोळू लागतात, तेव्हा कुठे तरी मनामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो आणि मग सुरू होते ती वादविवाद स्पर्धा. पण या सगळ्यांमध्ये प्रेम कुठे तरी हरवून बसते. पहिलं प्रेम, पहिला स्पर्श, या सगळ्यांचे अर्थच बदलून जातात. नात्यात राम नाही असे भासू लागते.अशा वेळी गरज असते सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यायची. पण नेमके हेच होत नाही. आणि मग नात्यांमध्ये दुरावा आणि गैरसमज निर्माण व्हायला लागतात.
 प्रत्येकच वेळी या सगळ्यांना नवराच कारणीभूत असतो असे नाही. स्त्रीची सुद्धा तितकीच जवाबदारी असते आपल्या नात्याला,त्या रेशीमबंधाला जपून ठेवायची.नोकरी करणार्‍या स्त्रियांचं आयुष्य खरोखरच धकाधकीचं असतं पण म्हणून काही कुणी आपल्या सांसारिक जबाबदार्‍यांपासून हात झटकत नाही. आपले सासू-सासरे आलेत हे पाहून कटकट करून, आपल्या नवर्‍याच्याच मनाला दुखवणं यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कुठलीच नसते.
 पूर्वीच्या काळीसुद्धा स्त्रिया काम करून संसार सांभाळत असत. पण त्यांनी कधी आपल्या सासू-सासर्‍यांची हेळसांड केली? उलट अगदी शेवटपर्यंत त्यांनी आपल्या सख्ख्या आई-वडिलांसारखा त्यांचा सांभाळ केला. मग आजच्या स्त्रीला हे का नको आहे? का फक्त नवरा एके नवरा हे समीकरण असतं? असेही नाही की सगळ्याच ठिकाणी नवरा व बायको यांची चूक असते. सगळ्या गोष्टी चांगल्या असून केलेल्या कार्याची दखल जर घेतली नाही,कौतुक जर झाले नाही तरीही केलेल्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटत नाही. आणि मग कुठे तरी ती आग धुमसत राहते. आणि एखाद्या नाजूक क्षणी त्या आगीचा उद्रेक होतो आणि मग सारे काही जळून राख होते.
 अशा नाजूक वेळी जर अनुभवी आणि घरातल्या मोठ्यांनी साथ नाही दिली आणि आपला अहं भाव दूर नाही ठेवला तर नाती तुटायला वेळ लागत नाही. लग्नाच्या कोवळ्या नात्याला सांभाळायला घरच्या मोठ्या लोकांचा हातभार हा हवाच असतो. त्याशिवाय लग्नाचं नातं अधूरं राहून जातं. त्याचमुळे कित्येकदा नवराबायकोची ताटातूट होते. आजच्या काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढले कारण कमतरता असते सुसंवादाची, समजूतदार विचारांची, लोकांची आणि नि:स्वार्थ वृत्तीची. देणार्‍याने देत जावे आणि आपण मात्र काही नाही करावे ही वृत्ती. पुन्हा एकदा जुन्या काळात व्हायचेत तसे भेदभाव आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात नाचणारा अहं भाव. मी आणि माझे ही वृत्ती. सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या की सगळ्यांना सुचणारा सोपा उपाय म्हणजे घटस्फोट.
 काही वेळा त्या प्रकारचा दुरावा न टाळता येण्यासारखा असतो, पण टाळता येण्यासारखा असेल तर निश्‍चितच टाळावा. नाती जोडायला वेळ लागत नाही, कष्टही लागत नाहीत पण ती टिकवायला कष्ट, वेळ आणि प्रयत्न तिघांचीही जोड हवीच. त्यातल्या त्यात विवाह बंधन हे तर इतके नाजूक नाते आहे की, ते जपण्यात कुणाचीही थोडीशी जरी चूक झाली, तरी हा रेशीमधागा सहज तुटू शकतो. तुम्हाला तर ठावूक असेलच गाठ पडलेल्या रेशमाची नक्षी कधीच सुंदर दिसत नाही ती नेहमी डोळ्याला बोचणारीच असते. लग्नाचेही तसेच काहीसे होऊन बसते. एकाने जरी मग सांभाळायचा प्रयत्न केला तरी तो एकतर्फी प्रयत्न कुठे ना कुठे अपुरा पडतोच आणि मग मन मोडून का होईना रीलेशनशिप स्टेटस् हे सेपरेटेड असं लिहावंच लागतं.

Relationship Status: Separated

Sarah and Ashwin; It sajesam recently married. 2 years ago they decided to prefer marriage to each other. Sarah had no idea how large of a company paying the corpulent, Sarika and live life on his own terms, and the United States returns but simple and straight Ashwin. Ashwin was the first mammaja boy said.

  Both stuck in bondage wedding Mars. Their parents were also added a new relationship with them. After marriage they both joined their work. Sarikala just a career and a king-Queen's world was in the air, but Ashwin but your entire family sarikasakata the air, and that was the reason why it was created rift in their married life. Neither the original nor the house 2 years, they have a dispute with the dispute. And response measures that divorce !!!

  Broken relationships, if not bayakoca both husband and family breaks. When taken in the context of changed words erase gelitagalyatila mangalasutraca married, the mother and father-in-law against her phasavekhora man !!!

  And to this day, which was separated on the same asayaceta States rilesanasipa Facebook Facebook profile photo with both. But really, can it fixed relationship status on Facebook chuckled signed by Changing or two paper?

  Married! Love match or preferably by parents, that only two jivancam and body if they do not meet the union would parivarancam two, two and a secret sanskrtincam and numerous new paper; Which the husband-wife, who is right and gave it as abandoned all. But really, why is able to destroy all the senses in a paper? Some of the vadavivadance convert it as todanarya decisions?

  Two creatures who love each other when, accept each other when they accept parivaralasuddha each other. Cukansakata accept each other's interests each other. And this is really the time for all gotavalyaca? Finding answers to all of these questions and seek is turning the need of the hour. There just is not to be responsible for the failed marriage mate, but both are responsible for the family too.

  The girl should look after his parents heard from? Then you do not have a husband who gave! And the same is also the case with the child's math. But are created when everybody takes encode rate ego question. He 's mother sasaryanci duty service. And not the child? Every time I am in? The question of when the girls start gholu heart, mind, and even where it needs to be created in the distances and the start of the debate competition. But this is where to sit when their love. First love, first contact, or are changing all the matter. Everyone needs time to understand each other in a relationship lagateasa felt that Rama. But just not the same. And then breaks it takes to be created in the distances and misunderstanding.

  This is not at all responsible for every navaraca. She is also equally responsible for your relationship, they would dhakadhakicam really saved the life of women who thevayacinokari resimabandhala but some who are not lit up his worldly obligations from. During your mother-in-law saw it coming by-law, no other thing than to worry dukhavanam mind navaryacyaca.

  By the kalisuddha women were the first at the world of work. But they never did neglect your mother-sasaryanci? But even they have until the end of their father to look after his real mother. And is not this woman today? This equation is only one of her husband? He is not the fault of the husband and wife in all. If things did not work at all interfere with the good, not the labor still felt something was not once appreciated. And even where it remains to burn like fire. At the outbreak of the fire and burned to ashes and then a delicate frame.

  If such a delicate time, experienced and not with the adults and family relations, but did not have time tutayala not far from his egoism. This is needed to help young people understand the marriage relationship a large home. In addition chuckled is staying adhuram relationship. Never had many Farewell navarabayakoci. Ghatasphotance rate increased because today is the lack of more information, reasonable ideas, people and selfless spirit. However, you should not be giving denaryane and attitude. Discrimination in the way vhayaceta old again and most importantly, the rate of ego everyone dancing in their heads. I and my attitude to this. If all things were together all acquit the simplest divorce.

  Some times it is not feasible to prevent the kind of distances, but definitely avoid if aoidable. Relations do not got time, labor costs, but they are not always been endemic labor, time and effort tighancihi pair today. Moreover, if the marriage relationship is so delicate that it was somewhat wrong when someone cherishes, but this can be easily fixed resimadhaga. You do not look beautiful embroidery s time who never visited, but it is always eye bocanarica necessarily prejudice. Lagnacehi and sits somewhat by. Even when one tried to understand the status and rilesanasipa Do not break the heart and then where do I go padatoca slim one-sided that it tends to lihavanca separated.

No comments:

Post a Comment