रत्येकीच्या आयुष्यातला 'तो' खास दिवस.. त्यावर केवळ 'तिचं' नि 'तिचं'च अधिराज्य असावं असं 'तिला' वाटणं साहजिकच आहे. त्या सोनेरी क्षणांना एक झळाळी लाभते ती 'तिच्या' दिसण्यानंही. कसा असावा ब्रायडल मेकअप, काय आहे सध्याचा ट्रेण्ड. याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.
बेस महत्त्वाचा
मेकअपचा बेस महत्त्वाचा असतो. सध्याचे थंडीचे दिवस लक्षात घेऊन मॉइश्चरायझर असलेला मेक-अप बेस आवश्यक आहे. याविषयी 'लॅक्मे'च्या मेकअप एक्स्पर्ट कोरी वालिया यांनी सांगितलं की, 'आपल्या स्किनटोनला एक्झ्ॉक्ट मॅच होईल, असा बेस वापरायला हवा. हा बेस लावण्यापूर्वी त्याची 'मिनी पॅच टेस्ट' घेतलेली बरी असते, म्हणजे तो सूट होतोय की नाही, ते कळतं. त्यामुळं तो हलक्या हातानं गालावर जबडय़ाच्या बाजूला लावावा. त्यामुळं आपसूकच चिक बोन्स हायलाइट होऊ शकतील.'
वाइन, ब्रॉन्झ, ब्लू शेड्स
याशिवाय मेकअप कलरविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, कॉम्प्लिमेंट्री मेकअप कलर्सच वापरा. उदाहरणार्थ, तुमच्या ब्लश नि लिपस्टिकचा रंग तुमच्या चुन्नीशी किंवा साडीशी मिळताजुळता हवा. आयलायनर नेहमीच सफाईदारपणं नि पापणीच्या जवळ लावा. डोळ्यांना शेड नि फाइन करायला विसरू नका. आयशॅडो व्यवस्थित लावणं पुरेसं आहे. कलिरग करण्याची जरूर नाही. सध्याच्या सीझनमध्ये वाइन, ब्रॉन्झ, ब्लू या फेस्टिव्ह शेड्स सध्याच्या वेिडग सीझनमध्ये इन आहेत.
ग्लॉस लुक हिट
मेकअपमुळं आपला लुक पूर्णपणं बदलून जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं बदलत्या ट्रेण्डचा विचार करता या सीझनचा हॉटेस्ट ट्रेण्ड 'ग्लॉस लुक' असेल. वेल हायड्रेटेड, डय़ू स्किन नि हाय-शाइन मेकअपचा त्यात समावेश असेल. ओठांच्या ग्लॉसी फिनिशसाठी रेड नि प्लम रंगांच्या शेड्स असतील नि डोळ्यांसाठी ज्वेल-टोण्ड शेड्सचा वापर केला जाईल. क्लीनझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग
मेकअपची पूर्वतयारी कशी असावी याविषयी 'ओरिफ्लेम इंडिया'च्या ब्युटी-मेकअप एक्स्पर्ट आकृती कोचर यांनी सांगितलं की, 'सुरुवातीला चेहरा क्लीनिझग, टोिनग नि मॉश्चरायिझग करून घ्या. मॉश्चरायझरमुळं त्वचेचं सौंदर्य अधिक खुलतं नि मेकअप करायला जणू कोरा कॅनव्हासच मिळतो.' स्किन प्राइमर निवडताना तो आपल्या स्किन टाइपनुसार निवडावा. क्रीम-बेस्ड प्राइमर नॉर्मल ते ड्राय स्किनसाठी आणि जेलबेस्ड किंवा मॅटफिनिश प्राइमर ऑईली स्किनसाठी निवडावा.
मेकअप करताना..
मेकअप बेस व्यवस्थित झाल्यानंतर डोळ्यांचा मेकअप काळजीपूर्वक करावा. त्यापूर्वी चिकबोन्स नि जॉ लाइन्सची रेषा डार्क ब्राऊन ब्लश किंवा ब्रॉन्झरनं काढून घ्यावी. गालांच्या गोलाकार भागावर ब्लश करावा नि मग 'टी झोन' अर्थात कपाळ, नाकाचा शेंडा नि हनुवटीवर हायलायटर वापरावा. कन्सिलरची एक बारीक रेघ पापणीवर ओढावी नि त्याचा बेस सेट होण्यासाठी पावडर वापरावी. ब्लॅक कोल आयलायनरनं लॅशलाइन काढून घ्यावी. मग आयश्ॉडो लावून घ्यावी.
लगेचच सुरकुत्यांवर डार्क ब्राऊन किंवा ग्रे आयश्ॉडो लावावी. ब्लॅक आयकोलनं वॉटरलाइन काढावी. थोडंसं गोल्ड शीन किंवा आयश्ॉडो दोन्ही पापण्यांच्या मधोमध लावावं. क्रीमकलरचा हायलायटर पापण्यांच्या कमानीच्या भागात लावा. तो नीट ब्लेण्ड करा. पापण्यांचा नॅचरल शेप लक्षात ठेवून टोकदार ब्रशनं डार्क ब्राऊन आयश्ॉडो लावावी. शेवटी लॅशेश कर्ल कराव्यात नि मस्काराचा भरपूर जाड कोट त्यावर लावावा. लिपलाइन परफेक्टली आखून घ्यावी. त्याच शेडनं ओठांना रंग भरावा. लाल रंग वापराल तेव्हा ग्लॉस वापरणं मात्र आवर्जून टाळावं.
No comments:
Post a Comment