Bhagyanka and Vivahagath

भाग्यांक आणि विवाहगाठ

भाग्यांकानुसारच त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, आचारविचार, मानसिक ठेेवण, भावना, महत्त्वाकांक्षा, प्रकृती, व्यवसाय तसेच कोणत्याही परिस्थितीत ती व्यक्ती कशी प्रतिक्रिया देणार, वागणार हे ठरते आणि म्हणूनच हा भाग्यांक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच विवाह ठरवतानाही भाग्यांकाचा अंकज्योतिषानुसार विचार करतात.
आजकालच्या काळात बदलत्या परिस्थितीनुसार लग्न (विवाह) ठरवताना वर व वधू ह्यांच्या पत्रिका पाहूनच विवाहाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकल्या जाते. मध्यंतरीच्या काळात ‘विवाहासाठी गुणमिलन आणि फलज्योतिषाद्वारे’ कुंडली मॅच करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते. परंतु आता अधिक काळजी घेऊन मगच मुला-मुलींचा विवाह करण्याची पद्धत परत रुजू झाली आहे. ह्यानुसार कुंडल्या तपासून तज्ज्ञ मंडळी किती गुण जमतात, कुंडल्यांवर मंगळाचा प्रभाव किती आहे. ग्रहानुसार कुंडलीधारकाचा स्वभाव, आजारपण, नोकरी-व्यवसाय, वैवाहिक तसेच नातेवाईकांशी मित्रांशी कुंडलीधारकाचे संबंध ह्यावरून काही ठोकताळे करतात. त्यामुळे गुणमिलन आणि फलज्योतिष ह्याद्वारे पारंपरिक पद्धतीत लग्नाचे निर्णय घेताना आपल्याला दिसून येते.
वरीलप्रमाणेच अंकज्योतिषाद्वारेही मुलगा-मुलगी ह्यांचा विवाह करणे योग्य आहे का याची कल्पना येते. ज्योतिषाकडे गेल्यावर गुणमिलनाबरोबर ही पद्धत अवलंबून पाहण्यात त्याला सांगावे. म्हणजे दोन्हीही पद्धतीद्वारे योग्य निर्णय घेऊन वधू-वरांचे पुढील आयुष्य वैवाहिक आयुष्य नंदनवन ठरेल, असा माझा ज्योतिषी म्हणून पूर्ण विश्‍वास आहे.
सर्वसाधारण लोकांना आपला भाग्यांक काढणे सहज शक्य आहे. व्यक्तीच्या जन्मतारखेची एकांकी बेरीज. हा आकडा काढताना नुसती तारीख, महिना, वर्ष ह्याला महत्त्व नसते. उदा. एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आहे ३१-५-१९८५. म्हणजे ह्या व्यक्तीचा भाग्यांक आहे ३+१ = ४. जर ह्याची जन्मतारीख ४, १३, २२, ३१ असली तरी भाग्यांक ४ च आला असता.
या भाग्यांकानुसारच त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आचार-विचार, मानसिक ठेवण, भावना, महत्त्वाकांक्षा, प्रकृती, व्यवसाय, तसेच कोणत्याही परिस्थितीत ती व्यक्ती कशी प्रतिक्रिया देणार हे समजून येते. म्हणूनच हा भाग्यांकच त्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे लग्न ठरवतानाही भाग्यांकाचा विचार सुद्धा करावा.
भाग्यांक आणि ग्रहः कोणत्याही महिन्यातील १, १०, १९, २८ तारखेचा भाग्यांक १ असतो. ह्याचा ग्रह रवि आहे. त्याचप्रमाणे २ भाग्यांकाचा ग्रह चंद्र, ३ चा गुरु, ४ चा हर्षल, ५ ह्या भाग्यांकाचा ग्रह आहे बुध, ६ चा शुक्र, ७ चा नेपच्यून, ८ चा शनि आणि ९ ह्या भाग्यांकाचा ग्रह आहे मंगळ.
अंकांची मैत्रीः प्रत्येक अंकाचे ‘मित्र अंक’ असतात. आपला भाग्यांक आणि समोरच्या व्यक्तीचा भाग्यांक हे जर परस्परांचे मित्र अंक असतील तर अशा व्यक्तीशी आपले उत्तम जमते, असा अंकशास्त्राचा सिद्धांत आहे.
अंक-१ मित्र अंक -१, ३, ४, ५, ७
अंक-२ मित्र अंक-२,४,६,
अंक-३ मित्र अंक-१, ३, ४, ६, ७, ९
अंक-४ मित्र अंक-१, २,४, ७, ८
अंक-५ मित्र अंक-१, ५,७, ८
अंक-६ मित्र अंक-२, ३, ६, ९
अंक-७ मित्र अंक-१, ३, ४, ५, ७, ८
अंक-८ मित्र अंक-४, ५, ७, ८
अंक-९ मित्र अंक-३, ६, ९
जोडी जमवतानाः लग्नाच्या दृष्टीने जोडी जुळते अथवा नाही हे बघताना सुरवातीला या मित्र अंकानुसार विचार केला जातो. त्यानुसार जमत असल्यास उत्तमच, अन्यथा दुसर्‍या टप्प्यावर जन्म महिन्यानुसार विचार केला जातो. जन्म महिन्यानुसार विचार करताना थेट महिन्याचा अंक/आकडा अथवा त्याची एकेरी बेरीज बघितली जात नाही. तर राशिस्वामीचा विचार त्यासाठी केला जातो. अंकशास्त्राने प्रत्येक महिन्यावर एकेका राशीचा अंमल गृहीत धरला आहे. आणि त्या त्या राशीचा स्वामी असणारा ग्रह कोणता हे इथे विचारात घेतले जाते. प्रत्येक गृहाशी एक-एक अंक निगडित आहे. उदा. एप्रिल हा महिना मेष राशीचा समजल्या जातो. त्याचा स्वामीग्रह मंगळ आहे. अंकशास्त्रानुसार ९ हा अंक मंगळाशी निगडित आहे. साहाजिकच एप्रिल महिन्याचा अंक ९ हा येतो.
त्यानुसार प्रत्येक महिन्याची राशी, राशिस्वामी आणि अंक असे आहेत.
जानेवारी-मकर-शनि-८, फेब्रुवारी-कुंभ-शनि-८,
मार्च-मीन-गुरु-३, एप्रिल-मेष-मंगळ-९, मे-वृषभ-शुक्र-६, जून-मिथुन-बुध-५, जुलै-कर्क-चंद्र-२, ऑगस्ट-सिंह-रवि-१, सप्टेंबर-कन्या-बुध-५, ऑक्टोबर-तूळ-शुक्र-९, नोव्हेंबर-वृश्‍चिक-मंगळ-९ आणि डिसेंबर-धनू-गुरु-३.
आकर्षण चौकोनः जर भाग्यांकानुसार व महिन्यानुसारही जमत नसेल तर आकर्षण चौकानानुसार विचार तिसर्‍या व अखेरच्या टप्प्यावर केला जातो.
आकर्षण चौकोन ह्याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे नैसर्गिक आकर्षण आपण जन्मलेल्या महिन्यातील जन्म असलेल्या व्यक्तींकडे तर असतेच, पण त्याशिवाय इतरही ३ महिन्यांतील जन्म असणार्‍या व्यक्तींकडे असते. ह्या आकर्षण चौकोनानुसार चार-चार महिन्यांचा गट पुढीलप्रमाणे होतो.
जानेवारी, एप्रिल, ऑक्टोबर, जुलै, फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर, ऑगस्ट. आणि मार्च, जून, डिसेंबर, सप्टेंबर.
जन्मतारखेचा ताळमेळः वधू-वरांची जोडी जमते की नाही हे बघताना भाग्यांकाबरोबरच जन्मतारखेचा ताळमेळही बघितला जातो. त्यानुसार भाग्यांक आणि त्या व्यक्तीच्या जोडीदाराचा जन्म कुठल्या कुठल्या कालावधीत असावा याचा खालीलप्रमाणे विचार करावा.
भाग्यांक जोडीदाराचा जन्म या दरम्यान
१ २१ जुलै ते २० ऑगस्ट
२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर
२ २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर
२१ फेब्रु ते २० मार्च.
३ २१ जून ते २० जुलै
२१ ऑक्टो ते २० नोव्हें.
४ २१ फेब्रु ते २० मार्च
२१ ऑक्टो ते २० नोव्हें
५ २१ ऑगस्ट ते २० सप्टें
२१ डिसेंबर ते २० जाने.
६ २१ ऑगस्ट ते २० सप्टें
२१ डिसेंबर ते २० जाने
७ २१ ऑक्टो ते २० नोव्हें
२१ फेब्रु. ते २० मार्च
८ २१ एप्रिल ते २० मे
२१ ऑगस्ट ते २० सप्टें.
९ २१ नोव्हें ते २० डिसें
२१ जुलै ते २० ऑगस्ट
जन्ममहिना जुळतो की नाही हे बघण्याची अजूनही एक पद्धत आहे. त्यानुसार पुढील तक्त्याचा विचार करावा. यातही आपण त्या त्या महिन्याची २१ तारीख आणि पुढील महिन्याची २० ता. घेणे उत्तम. जन्ममहिना जानेवारी ते जोडीदाराचा जन्ममहिना डिसेंबर ते जानेवारी, एप्रिल ते मे आणि ऑगस्ट ते सप्टेंबर. (म्हणजे २१ डिसेंबर ते २० डिसेंबर वगैरे)
फेब्रुवारीत जन्म असणार्‍यांसाठी जाने ते फेब्रुवारी, मे-जून, सप्टें-ऑक्टो. मार्चसाठी फेब्रु-मार्च, जून-जुलै, ऑक्टो-नोव्हें. एप्रिलसाठी मार्च-एप्रिल, जुलै ते ऑगस्ट, नोव्हें ते डिसें. मे जन्म महिन्यासाठी एप्रिल-मे, ऑग-सप्टें आणि डिसेंबर-जाने. जून महिन्यासाठी मे-जून, सप्टें-ऑक्टो आणि फेब्रु-मार्च. जुलैसाठी जून-जुलै, ऑक्टो-नोव्हेंबर, मार्च-एप्रिल. ऑगस्टसाठी जुलै-ऑगस्ट, नोव्हें-डिसेंबर, मार्च-एप्रिल. सप्टेंबर जन्महिना असल्यास जोडीदार ऑगस्ट-सप्टेंबर, डिसेंबर-जानेवारी, एप्रिल-मे. ऑक्टोबरसाठी सप्टेंबर-ऑक्टोबर, जाने-फेब्रु, मे-जून, नोव्हेंबर साठी ऑक्टोबर-नोव्हेंबर, फेब्रुवारी-मार्च आणि जून-जुलै-निवडावा. डिसेंबर महिन्यात जन्म असता जोडीदाराचा जन्म नोव्हेंबर-डिसेंबर मार्च-एप्रिल किंवा जुलै-ऑगस्ट असणे चांगले मानल्या जाते.
निष्कर्षः ज्यावेळी भाग्यांकानुसार दोघांच्या तारखा जुळतात तेव्हा पती-पत्नीत विशेष मतभेद होत नाहीत. जर तारखा महिन्यानुसार जुळत असतील तर मतभेद होतीलही, पण ते मतभेद लवकरच दूर होतात.
वरील दोन्ही पद्धतीप्रमाणे न जमता जर आकर्षण चौकोनाप्रमाणे दोघांचे जुळत असतील तर मतभेद होत नाही असे नाही, होतात पण ते थोड्या प्रयत्नांनी मिटतील, असा अर्थ होतो.
या तीनही पद्धतीप्रमाणे तारखा जुळत नसतील, फलज्योतिषानुसार ग्रहमिलन आणि गुणमिलन जमत नसतील, तर मुलगा व मुलगी यांचे अंकज्योतिषानुसार लग्न करणे योग्य नाही, असा संकेत मिळतो.

Bhagyanka and vivahagatha


Type of person they bhagyankanusaraca, acaravicara, mental theevana, feelings, ambitions, health, business, and how a person will react to it in any case, and as a tempo that is very important is bhagyanka leads. Hence the idea of marriage tharavatanahi bhagyankaca ankajyotisanusara.

Marriage in today's changing circumstances (married) determining the next step is putting the lives of the bride and groom before the wedding magazine pahunaca. In the days of 'marriage gunamilana and phalajyotisadvare' rate was too low to match the coil. But now more concerned with the post-back method to kill the child marriage of girls. How come the assembly points depending expert check kundalya, the effect is much kundalyam on record. Grahanusara kundalidharakaca being, illness, job-occupation, marital and family relations are thokatale some friends kundalidharakace hyavaruna. So gunamilana and astrology with blood showed us the traditional marriage decision process.

Ft ankajyotisadvarehi can imagine that every child has the right to be married-girl. Let him relax after seeing this, depending on the method gunamilanabarobara. The voice of the bride-marital life in the next life, that would be a paradise right decision both method, that is my belief, as an astrologer.

Ordinary people can easily draw your bhagyanka. The sum of the individual acts birthday. This figure out just the date, month, year, do not import them. Eg. If a person is born 31-5-1985. This person is bhagyanka 3 + 1 = 4. If this is the birthday of 4, 13, 22, when he was 31, although the bhagyanka 4 f.

In the interests of individual morals bhagyankanusaraca, mental shape, feelings, ambitions, health, business, and it is understood that a person will react to any situation. That leads to a very important person for this bhagyankaca. So should also consider marriage tharavatanahi bhagyankaca.

Any month bhagyanka and grahah 1, 10, 19, 28 bhagyanka date is 1. This planet is the sun. Similarly, 2 bhagyankaca planet Moon, 3 of the Guru, 4 of Herschel, 5 bhagyankaca this planet is Mercury, Venus 6 of 7 of Neptune, Saturn, 8 and 9 of this bhagyankaca planet Mars.

Maitrih points each rail 'No friends' are. If the number of the person in front of your bhagyanka and mutual friends if this is in the best of your bhagyanka such person is ankasastraca theory.

Figure 1 friend No 1, 3, 4, 5, 7,

No-No-2 friends 2, 4, 6,

No-No-1, 3 friends, 3, 4, 6, 7, 9

No-No-4 friends 1, 2, 4, 7, 8

Figure 5-friends-digit 1, 5, 7, 8

No Friends No-6-2, 3, 6, 9

Figure 7 friends No-1, 3, 4, 5, 7, 8

No-No-8 friends 4, 5, 7, 8

Figure-9 friend No-3, 6, 9

The pair are considered the top point of a friend or see it in terms of whether or not it matches a pair of wedding jamavatanah. If you want to do, according to a wonderful, otherwise it is considered the birth of the second stage of the month. Birth month by month considered when the direct number / total number or not seen his singles. If the idea is to rasisvamica. Ankasastrane is assumed over the amount each month. What is the planet with the owner and his equals considered here. Each house is linked to a number. Eg. April is the month of Aries is understood there. Mars is its svamigraha. Ankasastranusara 9 is associated with the record number. This is their back to 9 points in April.

According to the amount each month, and the number rasisvami are.

8-Jan-Capricorn-Sat, Sat-Feb-Aquarius-8,

March-mean-guru-3, April-Aries-Mars-9, 6-May-Taurus-Venus, Mercury-Gemini-June-5 July-cancer-moon-2, 1-August-lion-Sun, saptembara daughter-Wed-5, October-Libra-Venus-9, 9-Nov-Scorpio-Tue and Thu-Dec-dhanu-3.

If bhagyankanusara attraction caukonah and monthly meeting is not the attraction caukananusara consider the third and final stage.

Magic squares means each person is born with a natural attraction flashes while persons born in one month, but also persons who are born in other 3 months. The attraction caukonanusara four months the group was as follows.

January, April, October, and in July, in February, May, November, August. And in March, June, December, September.

It is easily seen that that is not a pair of coordinates bhagyankabarobaraca birthday birthday talamelah-the voice of the bride. According to that person's spouse born bhagyanka and consider which of the following should be any period of time.

Bhagyanka partner during the birth

1 21 July to 20 August

21 November to 20 December

2 21 October to 20 November

21 Feb to 20 March.

3 21 June to 20 July

Oct. 21 to Nov. 20.

4 21 Feb to 20 March

21 Oct to 20 Nov

5 21 August to 20 September

December 21 to 20 to go.

August 6 to 20 Sep 21

December 21 to 20 to

7 Oct 20 Nov 21

Feb. 21. To March 20

8 to 21 April to 20 May

21 August to 20 September.

9 Nov 21 to Dec 20

21 July to 20 August

This is still not a ton of matches janmamahina see. According to consider the following tables. Of those, one of those 21-month and 20-month date and the next user. To take the best. Janmamahina partner janmamahina January to December, January, April and May and August to September. (December 20 to December 21, etc.)

To be born with the February February, May-June, Sept.-Oct. March to February-March, June-July, Oct.-Nov. April to March-April, July, August, November and Dec. For the month of May was born in April-May, August and December-Sep-being. For the month of May-June, June, Sept-Oct and Feb-March. June-July to July, Oct-Nov, March-April. July-August to August, Nov-Dec, March-April. If janmahina September spouse August-September, December, January, April-May. October to September-October, when the Feb-May, June-November, for the October-November, February-March and June-July-select. Born in the month of December when the birth partner is considered to be better in November-December and March-April or July-August.

Husband-wife does not match the dates of the differences between special and Outcome of bhagyankanusara time. If the dates match the argument hotilahi month, but they are out differences soon.

Do not freeze on the basis that there is no conflict if not match the rest caukonapramane attraction, but they are few efforts erases, means.

Dates do not match those of the three, and together gunamilana not phalajyotisanusara grahamilana, if not possible wedding of the son and daughter ankajyotisanusara, reveals that the signal.

No comments:

Post a Comment