दागिने हा संपूर्ण स्त्री जगताचा लाडका विषय आहे. नुकतीच मुंबईमध्ये 'द
आर्टिसन ज्वेलरी डिझाइन अवॉर्ड्स'ची प्राथ़मिक फेरी पार पडली. या
स्पर्धेमध्ये भारतभरातून उदयोन्मुख ज्वेलरी डिझायनर्सना त्यांचं कलेक्शन
दाखवण्याची संधी मिळणार आहे. यंदा या स्पर्धेची थीम आहे. भारतीय सिनेमाची
शंभरी. भारतीय सिनेमाची १०० वर्षे ज्वेलरीच्या माध्यमातून साजरी करण्याचा
प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी स्पर्धकांना मोनोक्रोमॅटिक मॅजिक (मूक
चित्रपट), गोल्डन एरा (१९४०-६०चे दशक), कलरामा (मसालापट), अव्हांगार्द
(आधुनिक सिनेमा) या चार थीम दिल्या होत्या. या थीमवर आधारित एक प्रतीकात्मक
फोटोसेशन अभिनेत्री सोनम कपूरसोबत करण्यात आलं होतं. प्रत्येक काळाच्या
थीमबरोबर जाणारे दागिने आणि पेहराव यात सोनमनं केले आहेत. त्याची एक खास
झलक..
मोनोक्रोमॅटिक मॅजिक (मूकपट)
भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रचली गेली तो हा 'ब्लॅक अँड व्हाईट' सिनेमा आणि मूकपटांचा काळ. त्या काळी प्रसिद्ध असलेल्या मोत्यांच्या दागिन्यांचा लुक सोनमला देण्यात आला आहे. आय मेकअपवर भर देणारा लाईट मेकअपसोबत, सटल लिप शेड यामुळे थेट त्या काळातली नायिका डोळ्यापुढे येते. नेकलेसवर फोकस देण्यासाठी इअररिंग्स छोटय़ा ठेवण्यात आल्या आहेत.
गोल्डन एरा (४०-६०चे शतक)
हेवी ज्वेलरीच्या या काळाचा फोकस रंगीत खडे आणि कुंदन यावर होता. विविध प्रकारचे जडाऊ दागिने, भरगच्च हेवी ज्वेलरी असल्याने मेकअप कमीत कमी ठेवला आहे.
अव्हांगार्द
(आधुनिक सिनेमा)
आजच्या तरुणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या लुकमध्ये एलिगंट आणि फाईन ज्वेलरीचा वापर करण्यात आला आहे. सटल मेकअप, भरपूर मस्कारा आणि न्यूट्रल शेड्सचा जास्त वापर केला आहे.
कलरामा (मसालापट)
मसालापटांच्या या काळामध्ये ड्रामॅटिक आय मेकअपवर जास्त फोकस होता. या काळातील ज्वेलरी फार भरगच्च नाही, पण फंकी आणि इनोव्हेटिव्ह होती.

No comments:
Post a Comment