Price of home servent

$img_title

मोलकरणीचे मोल

नोकरदार महिलांसाठी भांडी, धुणी, केर, स्वयंपाक, मुलांना सांभाळणं, दळण आणणं अशी कितीतरी कामं करून घरकामाची मोठी जबाबदारी सांभाळणारी मोलकरीण म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनातील महत्त्वाचा आधारच म्हटला पाहिजे. घराबाहेर वावरताना, मोठमोठी पदे भूषवताना अनेक नोकरदार महिलांना घराची आवश्यक तेवढी काळजी घेणं त्यांच्या बिझी शेड्युलमुळे जमतंच असं नाही. अशा वेळी त्यांच्या घरातील बरंचसं काम दुसरी कुठली तरी महिला सांभाळत असते. मात्र या घर सांभाळणार्‍या महिलांचं आयुष्य किती कष्टमय असतं, याचा विचार मालकीण महिला करतात का? त्या बाईचं मन जाणून घेण्यासाठी तिच्याशी दहा मिनिटं आपुलकीने बोलतात का?त्यांना जाणून घेतलं तर या कामवाल्या स्त्रिया आपल्यापेक्षा कितीतरी धिराच्या आणि कर्तृत्ववान आहेत,असं जाणवल्याशिवाय राहणार नाही.
 घरकाम करणार्‍या या स्त्रियांचा सर्वात मोठा त्रास म्हणजे त्यांचे दारूडे पुरुष. पुरुष कामधंदा करत असला तरी ९० टक्के पुरुषांची मिळकत दारुतच जात असते. त्यामुळे संसाराचा गाडा बहुतेक वेळ या स्त्रियांच्या कमाईवरच चालत असतो. भल्या पहाटे कामावर जायचं, बरं या लोकांची वस्तीदेखील बर्‍यापैकी लांब असते. ते अंतर पायीच पार करायचं. गाडी-बस यांसारखी साधने त्यांना परवडणार थोडीच आहेत? दिवसभर कामं करायची, संध्याकाळी घरी जाऊन पुन्हा घरचं सगळं आवरायचं, त्यात रात्री नवरा दारू पिऊन आला म्हणजे मारझोड-शिवीगाळ ठरलेलं असतं.
 आमच्या कामवाल्या बाईचं, तिच्या धैर्याचं मला मोठं कौतुक आणि आदरही वाटतो. लहान वयात लग्न झालं. पदरात दोन मुलं, नवरा सतत दारू पिणारा, मारणारा. शेवटी त्याला न सांगता एक खोली भाड्याने घेतली. मुलांना शाळेत घातलं आणि स्वत: दिवसभर १०-१२ घरची कामं करू लागली. नवरा अखेर दारूपायी गेला. त्याचे सर्व दिवसपाणी हिनेच केले. ती म्हणते, ‘एकदा मुलं चांगली शिकली म्हणजे मिळवलं. मला दुसरं काही नको.’ असा विचार आणि कृती करण्याचं बळ कुठून आणलं असेल तिनं? पंचविसाव्या वर्षी दोन मुलांची जबाबदारी, नवर्‍याचा आधार नाही, शिवाय समाजाच्या जळजळत्या नजरा हे सगळं सांभाळण्याचं धाडस, ही क्षमता कुठून आत्मसात केली असेल?
 वाढत्या महागाईशी तोंडमिळवणी करताना या स्त्रिया अधिक कामं धरतात. अंगात पुरेशी ताकद नसते. साधारणपणे प्रत्येक महिलेची सरासरी सहा कामं धरली तरी रोज दीडशे भांडी घासावी लागतात, ८-१० बादल्या धुणं, साधारण दोन हजार चौ. फूट जमीन झाडणं आणि ती पुसणं, स्वयंपाक असेल तर चार घरच्या जवळपास ४०-५० पोळ्या. ही झाली बाहेरच्या कामांची यादी आणि स्वत:च्या घरचीही कामं त्यांनाच करावी लागतात. हा एक दिवसाचा हिशेब. महिनाभराचा हिशेब काढला तर किती जास्त काम होतं हे! त्या मानाने त्यांना कष्टाएवढे पैसे मिळतात का? सकाळी पुरेसं अन्न न खाताच त्या घर सोडतात. आजारपण आलं तरी उपचाराचा खर्च पेलवणार नाही म्हणून त्या दुखणं अंगावरच काढतात. त्यात भरीस भर म्हणजे लग्न-समारंभ यासाठीही त्या उचल घेतात. ते पैसे फेडायचे असतात. या स्त्रियांचं सरासरी उत्पन्न सहा ते सात हजार असतं. मात्र, कष्टाला त्या कधीही कमी पडत नाहीत. त्यांच्या या जिद्दीला सलाम ठोकायलाच हवा. त्यांच्या या संघर्षाची, कष्टांची दखल समाजाने, सरकारने घ्यायलाच हवी. चार दिवस कामवाली बाई येणार नाही, असं म्हटलं तर मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रीच्या तोंडचं पाणी पळतं. घरातील शांती, समाधान बर्‍याच अंशी या कामवाल्या बाईवर अवलंबून असतं, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये.
 या स्त्रियांच्या वर्तमान परिस्थितीला त्यांचं अपुरं शिक्षण, इंग्रजीबाबतचं अज्ञान ही महत्त्वाची कारणं आहेत.आठवी-दहावीपर्यंत यांचं शिक्षण झालेलं असतं. पण इंग्रजीचं पुरेसं ज्ञान नसल्याने त्यांना दुसर्‍या नोकर्‍या मिळत नाहीत.त्यामुळे घरकामाशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. या स्त्रियांचं आणखी एक कौतुक म्हणजे समाजात पैसा कमावण्याचे ‘इतर’ पर्याय उपलब्ध असतात. त्या मानानं कष्टाचं काम स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्या चारित्र्याबद्दलही अधिक आदर वाटतो. नैतिक अध:पतन न होऊ देता, दारुडा नवरा सांभाळत त्या खंबीरपणे उभ्या राहतात.
 म्हणूनच या स्त्रियांना किमान वेतन, विमा, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन यांसारखे हक्क मिळायला हवेत. व्यसनी पती, महागाई यामुळे त्यांची झोळी फाटकी झाली आहे. या सुविधा त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी नक्कीच उपयोगात येतील. सरकार या कामवाल्यांसाठी कायदेशीर नियम आखेल तेव्हा आखेल. पण आपण मध्यमवर्गीय महिलांनी तरी यांच्याशी माणूसपणाने वागून कधी तरी ताजा पदार्थही तिला खायला द्यावा. तिच्या आजारपणात थोडीफार वैद्यकीय मदत करावी, शक्य असल्यास त्यांच्या एखाद्या मुलाच्या शाळेची फी अथवा पुस्तकं द्यावीत. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची घडी बर्‍याच अंशी कष्टकरी महिलांवर अवलंबून आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणूनच वास्तवाची जाणीव ठेवून घरात काम करणार्‍या या स्त्रियांसाठी त्यांच्या मालकिणींनी शक्य ती मदत अवश्य केली पाहिजे. या मोलकरणींचं महत्त्व जाणून त्यांना माणुसकीची वागणूक दिली पाहिजे.

molakaraniche hire

Working women pots, dhuni, litter, cooking, children to handle, how much work would be the responsibility of the imputed rent is to be called adharaca important communication ananam responsible maid daily life fast. Outdoors addition, major posts jamatanca sedyulamule not busy enough to take care of their house, many women working bhusavatana. What is holding the second time when women drive their household work. The home is depressing how many women sambhalanarya life, the idea of women's mistress? Speak affectionately of her ten minutes to learn about the mind easily identified if they know about this kamavalya than women, and there are many dhira period, it will not be janavalyasivaya.

  The biggest annoyance is that the largest of these women and their male alcohol. Although the Employment men are going to darutaca means 90 per cent of males. So expect most of the time is running gun kamaivaraca of women. Good morning to go to work, do a long time for these people vastidekhila. They want to cross payica difference. Train-Bus devices are like a little luxury to them? Throughout the day to work in the evening, going home again gharacam avarayacam all, it was a night of drinking alcohol is marajhoda-husband abused None.

  Our kamavalya easily identified, her dhairyacam I am not a big appreciation and who takes the decisions. We got married young age. Why two children, husband constantly drink alcohol, beater. Finally, he took a rented room without. Children and applied themselves throughout the day and began to work 10-12 households. Darupayi husband went last. Its all divasapani act. She says, "Once won the boys learned better. I do not for some time. "I thought, and she will be brought where the strength, to act? Twenty-year commitment of two children, my husband does not support, and venture sambhalanyacam mind watching jalajalatya society, where there will be a correction capability?

  On giving women more work while inflation tondamilavani. Strength is not enough power. Every day an average of six women, although generally treated as work takes ghasavi two pots, buckets dhunam 8-10, about two thousand sq. Feet of land jhadanam and pusanam, chapati 40-50 around four home if cooking. This was out of work and a list of your own home work required to be them. This is an account of the day. This was much more than a month, but took account of work! They greatly kastaevadhe get them money? Leave the house and khataca not enough food in the morning. Although the illness was nothing they cast angavaraca not pelavanara as therapeutic costs. Marriage ceremonies yasathihi They all insist on it-take. That money to pay. These women would generate an average of six to seven thousand. However, hardly any of them are not. Through their love thokayalaca air. Their struggle, labor interfere society, the government should hate him. Not four days working woman, middle-class family, but she said that the tondacam water palatam. House of peace, reconciliation would depend on the woman or kamavalya many respects, should not be an exaggeration if I said that.

  The current situation of women to choose their education, ingrajibabatacam ignorance there is quite a learning Desirable important reasons ahetaathavi-dahaviparyanta. But ingrajicam not enough knowledge, they do not spare them another option gharakamasivaya nahitatyamule getting second jobs. These women and an appreciation of the society making money 'other' option are available. The mananam kastacam accept work. So I am more respected in their definition. Moral degeneration does not cause the collapse, they live ammunition husband standing firmly holding.

  So the minimum wage for women, insurance, provident fund, pension rights, such as the air always. Addicted husband, because inflation has been begging their gate. This facility will be used to improve the course of their lives. Akhela when the government or kamavalyam for akhela legal rules. But sometimes when you feed her fresh products manusapanane against the middle-class women, though. Her child to some medical help, if possible, to give their child's school fees, books or a. Middle-class, middle-class family is dependent on women working in high crease many respects, it can not be denied. That should be possible to help those who work for the women of the house, and put them malakininni aware of the reality. This molakaranincam should know the importance of humanity and executed them.

No comments:

Post a Comment