dashkriya vidhi patrika
dashkriya vidhi quotes in marathi
dashkriya vidhi in marathi
dashkriya vidhi text message in marathi
dashkriya vidhi template in marathi
dashkriya vidhi banner background in marathi
dashkriya vidhi banner marathi
dashkriya vidhi invitation card format
पितृदोष कारणे
बहूतांशी लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असतोच असतो . याला कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप हे आहे . गरूड पुराणा नुसार , अंत्यकर्मा नंतर करावयाचा विधी हा सर्वांना एकसारखाच असतो तो म्हणजे दहनापासून दहावे दिनी दशक्रिया विधी , नंतर ११ , व १२ वा एकत्र वा वेगवेगळा , या बाराव्यात सपींडी म्हणून विधी असतो जो हल्ली केलाच जात नाही . यावर उत्तर मिळते आमच्यात करत नाही ! परंतू या वेळी कोणताही भेद न करता सर्व वर्णांना एकाच प्रकारचे विधी शास्त्रात दिले आहेत . या नंतर करतात तेरावा . व नंतर उदकशांती करून वर्षभराने प्रथमाब्दिक करतात . या वेळीही अब्दपूरीत व प्रथमाब्दिक अशी दोन श्राद्धे करावयाची असतात जी कोणी हल्ली करत नाहीत . तसेच घरात कोणी पुर्वी बाहेर गेला तिर्थ यात्रेस गेला तर तो परत येईलच याची शाश्वती नसायची व तो तिकडे जिवंत आहे वा मृत याचाही पत्ता नसायचा ! अशावेळी बारा वर्षे वाट पाहून तो मृत आहे असे समजून पळसाच्या पानांचा पुतळा बनवून त्याचे दहन करून मग पुढील विधी करावे असे शास्त्र सांगते . परंतु हे कोणी पूर्वी केले होते वा नाही हे समजण्यास मार्गच नसतो कारण , पिढ्या विभक्त झाल्या व वृद्ध लोक जे मार्गदर्शक असतात त्यांना हवा तसा सन्मान दिला जात नाही ! तर वरील सर्व गोष्टी पितृदोषास कारणी भूत ढरतात . आता आपण अंत्येष्टीतील विधी जाणून घेऊत व नंतर क्रमाने पितरांचा त्रास नेमका कसा ओळखावा व त्यावरील उपाय काय ते दररोज जाणून घेऊ
------ Pitra Dosh Pitra Dosh Ke Upay Pitra Dosh Kya Hota Hai Pitra Dosh Ke Lakshan Pitra Dosh Nivaran Mantra Pitra Dosh Remedies Pitra Dosh Meaning Pitra Dosh Remedies For Marriage Pitra Dosh Puja Pitra Dosh In Kundli How To Remove Pitru Dosh Pitra Dosha Pitra Dosha Calculator
श्रद्धांजली
मनुष्य मृत झाला की सर्व संपले असा अनेकांचा समज असतो . परंतू मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती अतीसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण होईल यासाठी झटत असते . देह जो प्रत्यक्ष दिसतो तो यानंतर कारण देह , महाकारण देह व सूक्ष्मदेह या रूपात ती व्यक्ती असते यातील सूक्ष्म देह तो पुढील मार्गक्रमणेस निघतो परंतु जोवर और्ध्वदैहीक होत नाही तोवर कारण व महाकारण देह तिष्ठत रहातात . आपण म्हणतो की कणखर मनाने केलेला संकल्प वातावरणात मिसळून तो पूर्णत्वासच जातो अगदी याच प्रमाणे जाणाऱ्या जिवाच्या जर इच्छा खूपच बाकी असतील व संसारात जिव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयाय ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी , आवडत्या व्यक्ती , जेवण बाकी असेल तर जेवण असे दिसत रहाते व तेच चिंतन करत ती व्यक्ती मृत होते
मनूष्य गेला तरी त्याचे डोळे चार तास , किडन्या चार तास , त्वचा वगैरे जिवंत असतात इतकेच काय तर चक्क रक्त प्रवाहही दोन तास सुरू असतो यातच वासना काय ते लक्षात घ्या ! तर अश्या या वासनांची पूर्ती करण्यासाठी लागलेली तगमग त्या जीवास मुक्ती मिळू देत नाही व ती सतत घरातील व्यक्तींस येनकेन प्रकारे अडचणी उत्पन्न करत असते अगदी तशीच जसे एखाद्या संकटातून एखादे पूण्य आपली सुटका करते तसेच !
ख्रीस्ती बांधव , पारशी लोक , इस्लामीक लोक इत्यादी लोकही पितृ कार्य करतात फक्त त्यांची पद्धत वेगळी असते . ख्रीस्ती बांधव हे मृताच्या कबरीवर फुले , वाईन , केक ठेवतात व त्याच्या स्मृतीसाठी वाटतातही !
अगदी प्राणीही आपल्या पूर्वजांस वंदन करतात . यात हत्ती हा प्राणी अत्यंत पुढे आहे . हा हत्तीचा कळप एका मादीच्या नेतृत्वाखाली अन्न व पाणी यांच्या शोधात स्थलांतर करीत असतो . वाटेत अनेक बांधव ( हत्तींचे ) मृत होतात . अशावेळी तेथे थांबून घोळक्याने श्रद्धांजली वाहून पुढे निघतात यावेळी गेलेला हत्ती ज्याच्या जवळचा असतो तो जरा रेंगाळतो परंतू त्याला काहीजण आधार देऊन बाहेर आणतात . हा प्रकार इथेच थांबत नाही तर ज्या तारखेस तो हत्ती/हत्तीण गेला होता त्याच दिवशी आठवणीने त्याच जागी सर्व कळप त्या मृतास मानवंदना देण्यास उपस्थित रहातो . यावेळी मृताच्या अस्थी तेथे असतात . कळपातील प्रत्येक सदस्य त्या उचलून आपल्या कपाळी लावतात . तेथे जरावेळ थांबतात व पुन्हा आपल्या मार्गाने जातात . ( हे सर्व मी नाही संशोधकांनी सिद्ध केले आहे ज्यावर डीस्कव्हरी या चॅनेलवर कार्यक्रम प्रदर्शीत केला गेला होता ) यावेळी कळपातील सदस्य काही खाण्याच्या वस्तूही नेतात ज्या त्या अस्थींजवळ अर्पीत करतात.
या सर्वात मानव अत्यंत प्रगत म्हणून त्यान आपल्या पूर्वजांस श्रद्धांजली देणे किती गरजेचे असते ते पहा !
------ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी श्रद्धांजली in English भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर फोटो Hd भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली Banner Background भावपूर्ण श्रद्धांजली सोंग
पिंडदान
प्रथम दिनी गेलेल्या व्यक्तीचा दाह संस्कार होतो यावेळी मृतस्थानी , द्वारस्थानी , विश्रांती स्थानी काष्ठ रचनेवेळी आणि चौकात पिंड देतात यामुळे भुमीवरील , गृहवास्तु , प्रेतास वाईट शक्तींनी अपवित्र करूनये यासाठी केले जाते . पुढे नवद्वारांवर पिंड ढेवून क्रव्याद नावाच्या मांस भक्षक अग्निस आवाहन करून बोलावले जाते . स्मशानात पिंडदान करताना प्रेतसखा म्हणजे त्या दिवशी आणखी कोणी गेलेली व्यक्ती असेल त्यासाठीही पिंडदान केले जाते .
नंतर प्रत्येक दिवशी स्मशानात जाऊन दहा दिवसांपर्यंत पिंड द्यावेत . नंतर दहाव्या दिवशी दशक्रिया विधी होते . जर दररोज पिंडदान केले असेल तर दहाव्या दिनी केवळ एक पिंड देऊन काक बली द्यावा लागतो अन्यथा एकाचवेळी दशपिंड द्यावे लागतात . ही दशक्रिया विधीची संकल्पना मानवी जन्मावर अधारीत आहे . जसे प्रथम मातेच्या गर्भात छोटासा पिंडच असतो तशीच कल्पना करून पहिला पिंड देतात . यात सम व विषम श्राद्ध अशी संकल्पना असते . विषमदिनी अवयव पिंडही देतात . पहिला पिंड मस्तक , दुसरा पिंड कान , नेत्र , आणि नाक , तीसरा पिंड गळा , खांदे , भुजा व वक्ष:स्थल , चौथा पिंड नाभी , लिंग /योनि व गुदा , पाचवा पिंड जानु , जंघा , पाय , सहावा पिंड सगळी मर्म स्थाने , सातवा पिंड सगळ्या नाड्या , आठवा पिंड दात केस वगैरे , नववा पिंड विर्य व रज , दहावा पिंड संपूर्ण शरीर . अगदी हेच आईच्या पोटातही घडत असते व दहाव्या महिन्यात बाळाचा जन्म होतो . याच संकल्पनेवर देह जळाला मग पुढे गर्भात जाताना त्या जिवास सगळे शरीर अवयव मिळावे हि संकल्पना असते . त्यामुळे दहावा हा दहाव्या दिवशीच करावा . तीसऱ्या , पाचव्या दिवशी नाही कारण यात वेळ किंवा कोणी नातेवाईक यावेत म्हणून दिला जाणारा हा वेळ नाही .
पाच बोळकी घेऊन त्यावर पाच पिंड सोबत पाच काड्यांवर पिवळ वस्त्र जे ध्वजे सारखे दिसते ते असते छत्री म्हणून . पाच पोळी पादूका जोड वगैरे असतात . पाच पिंड पहिला गेलेल्या व्यक्तीचा , दुसरा प्रेतसखा , तीसरा वैवस्वत यम , चौथा वायस म्हणजे कावळा व पाचवा प्रेताधिपती रूद्राच्या नावे द्यावा . यानंतर वायसबली म्हणजे कावळा शिवणे होते . व कावळा शिवला नाही तर दर्भाचा कावळा करतात . यात दर्भ , काळे तीळ , जव व पांढरी फुले , माका , तुलसीपत्र अत्यंत महत्वाचे असते .
----- Pind Daan Gaya Pind Daan Meaning Pind Daan Vidhi Pind Daan Mantra Pind Daan Kya Hota Hai Pind Daan Movie Pind Daan Kab Karna Chahiye Pind Daan Ki Vidhi In Hindi Pind Daan Wiki Gaya Pind Daan Pehowa Pind Daan Types Of Pind Daan Can Pind Daan Be Done Twice Gaya Pind Daan Cost In Hindi Gaya Pind Daan Cost How To Do Pind Daan At Home Gaya Ji Pind Daan Sapne Me Pind Daan Karna
दहाव्या नंतर
अकरावे दिनी सर्व घरातील कपडे वगैरे स्वच्छता केली जाते . यानंतर पंचगव्य वगैरे प्राशन करून वृषोत्सर्ग विधी पूर्वी करीत असत . याच दिवशी एकोद्दिष्ट ( म्हणजे फक्त एकास उद्देशून केलेले ) श्राद्ध केले जाते . यापाठोपाठ रूद्रगण श्राद्ध , वसुगण श्राद्ध व यानंतर मलीन मासिक श्राद्ध केले जाते . यावेळी विविध दशदाने करून समाप्ती केली जाते .
बारावे दिवशी सपिंडी श्राद्ध केले जाते . यात चार पिंड बनवून त्यातील गेलेल्या व्यक्तीच्या नावाच्या पिंडाचे तीन भाग करून बाकीच्या तीन पिंडात मिसळले जातात . चार पिंडात पहिला पिंड मृत व्यक्तीचा , दुसरा पिंड प्रेताचे वडिल , तीसरा आजोबा , व चौथा पणजोबांचा असतो . यातील पहिल्या पिंडाचे तीन भाग उरलेल्या तीन पिंडात मिसळल्यावर गत व्यक्ती पितृलोकी जाते व पणजोबांस मुक्ती मिळते . हा विधी केल्या शिवाय सुतकातून सुटकाच होत नाही व पुढे कोणतेही शुभ कर्म करू शकत नाहीत हा नियम सर्व वर्णांस लागू आहे . नंतर पाथेय श्राद्ध करून विधी संपतो .
तेरावे दिनी प्रथम निधनशांती करतात . यात गणेशपुजन पुण्याहवाचन रूद्र पुजन करतात व विप्रांकडे विविध सुक्ताचे पठण करतात तर बाकीकडे हवन केले जाते . नंतर सुतकात गंध , कुंकू वगैरे लावलेले नसते ते लावून घरातील देवपूजा केली जाते . या विधीसाठी चार गुरूजी लागतात . यात उंबऱ्यावर सुपारी फोडली जाते .
यानंतर तेराव्याचे श्राद्ध केले जाते . यासोबतच शुद्ध सोळा मासिक श्राद्धे केली जातात . यात तेरा ब्राह्मण भोजनास सांगतात . परंतू अभावी किमान पाच म्हणजे दोन देवा कडील व तीन पितरांचे असे भाेजन करतात . यास मासिक निवृत्ती असेही म्हणतात . आलेल्या गुरूजींस व चालवणाऱ्या गुरूजींस दशदाने पददानादी सह उदककुंभ व दक्षिणा दिली जाते . दुपारी आहेर करून यजमानांचे मामा यजमानास मारूतीच्या मंदिरात नेतात . तेथे नवीन निरांजनात दिवा लावून नमन करून बाहेर पडताना देवळाची घंटी वाजवतात . यादिवसापासून रोजची कर्मे करण्यास सुरूवात केली जाते . जर कोणाचा विवाह ठरला असेल तरच तो विनायक शांती करून करावा अन्यथा पुढे तीन वर्षे विवाह करता येत नाही हा समज अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे असे करू नये .
----- दहावे दिवसाची क्रिया अंत्येष्टि,
काकबलि दररोज ज्याठिकाणीं पिंड दिले त्याठिकाणी अगर दुसरे ठिकाणीं त्रिकोणाकृति वेदी करून ती शेणानें सारवून तीवर, हळद, गुलाल, इत्यादि घालून कर्त्यानें मध्यें एक व त्याचे चार दिशांस चार असे उदकुंभ मांडावे. त्यावर पिंड, छत्र, पोळी, पताका, पादुका, ही अस्थिसंचयन श्राद्धाप्रमाणें ठेवावी. मधला उदकुंभ प्रेतास, पूर्वेकडील प्रेतमित्रांस, दक्षिणेकडिल वैवस्वत यमास, पश्चिमेकडील वायसास व उत्तरेकडील प्रेताधिपति रुद्रास, याप्रमाणे पदार्थ तहान भूक शांत होण्यासाठीं द्यावे. पश्चिमेकडील पिंडास कावळा शिवेपर्यंत तेथें राहावें. कावळा शिवल्यावर, अश्म्याला तेल व तीळ लावून तो पाण्यांत टाकावा; ( कित्येक याचवेळी प्रेतत्व निवृत्तिसाठीं दशदानें करतात. ) व कर्त्यानें आप्तस्वकीयांची प्रार्थना करावी की प्रेताच्या नांवानें आपण उदकांजलि द्यावी; व प्रेताला उद्देशून त्यांणी तीरावर एक एक किंवा तीन तीन उदकांजलि द्याव्या. ( मृताबद्दलचा आदर व्यक्त करण्याचा क्रियेला उद्देश आहे. ) पुत्र वगैरेनी क्रियेकरितां घेतलेल्या वस्त्रांचा त्याग करावा व क्षौर करावें. व सर्वांनीं देशाचाराप्रमाणें वाटलेल्या पांढर्या मोहर्या किंवा वाटलेले तीळ व आंवळकाठी अंगास लावून सर्वांनीं एकदम मस्तकावरून स्नान करावें. आणि मौन धारण करून बैल, गाय, सोनें यांस शिवून पांढरें वस्त्र नेसून घरी जाऊन भोजन करावें.
------------------------------ Dashkriya Vidhi Invitation In English Dashkriya Vidhi Message In English What Is Dashkriya Vidhi Called In English Dashkriya Vidhi Meaning In English What Is Vidhi In English Meaning Of Dashkriya Vidhi In English Dashkriya Vidhi Meaning What Is The Meaning Of Vidhi In English What Does Vidhi Mean In English
तेराव्या नंतर
तेरावे वगैरे आटोपल्यावर चौदावे दिवशी वातावरण शुद्धी साठी उदकशांती नावाचा विधी करतात . उदकशांती अर्थात जलाची शुद्धी असा सरळ अर्थ होतो परंतु प्रत्यक्षात जर पाहीले तर जल हे अत्यंत पवित्र मानून त्याद्वारे समंत्रक केलेली पंचतत्वांची शुद्धी म्हणजे उदकशांती होय . जर आपण मृत झालेल्या व्यक्तीच्या घरात गेलात तर सहज लक्षात येते की तिथे संपूर्ण भागात उदासी पसरली आहे . मग अशावेळी हे शोकमग्न वातावरण सारून पुढे चालणे व दैनंदिन कामे करणे ही निकड असते . यासाठी ही उदकशांती करतात .
काही लोकांचा गैरसमज असतो की उदकशांती हा विधी फक्त यावेळीच केला जातो परंतु , तसे नसून हा विधी घरातील कलह , आजारपण , काही विशीष्ट होणारे त्रास , सतत मानसिक तणाव व त्यामुळे सर्व घर डीस्ट्रब होऊन सतत भांडणे , नुकसान व याने झालेली पंचतत्वांची हानी भरून काढण्यासाठीही हा विधी दर सहा महिन्याने आपल्या घरी करावा असे शास्त्र सांगते . तसेच नारायणबली , व नागबली करून आल्यावरही काही लोक ही उदकशांती करतात . स्थानिक गुरूजी ज्यांनी नारायण बली केलेला असतो ते याबद्दल कल्पना देतात किंवा ज्या गुरूजींनी हा विधी करण्यास पाठवले ते याबद्दल सांगून हा विधी करवून घेतात .
या विधीत चार गुरूजी असतात . प्रथम गणेशपुजन व पंचवाक्यीय पुण्याहवाचन करून मग एका नवीन कलशास धुपवून त्यात पाणी घातले जाते . येथे हवन करीत आहोत अशी संकल्पना करून हवनाचे वेळी हवनपात्रासाठी करण्याचे स्थंडील कर्म करतात . नंतर चारही दिशेस दर्भ मांडून ब्रह्मदेवांचे पूजन केलेल्या कलशावर शंभर ते हजार अश्या प्रकारे दर्भाचे अच्छादन करतात . हे अच्छादन एखाद्या झोपडी सारखे दिसते .
चारही दिशांस बसून चारही गुरूजी चतुर्वेदातील ऋचांचे स्वर व सुरात पठण करतात . नंतर यजमानासह सर्व कुटूंबीयावर आंब्याच्या डहाळीने ब्रह्मकलशातील पाण्याने गुरूजी अभिषेक करतात ! यानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन होते . मग यजमानास आशिर्वाद मंत्राने नारळ देऊन तो नारळ यजमानांनी पत्नीच्या ओटीत द्यायचा असतो व या नारळाचे गोड पदार्थच बनवतात .
----- दशक्रिया विधी मराठी संदेश अंत्यविधी मृत्यू नंतरचे जीवन udaka शांती पूजा मराठी मधील मृत्यू नंतर तेरावा विधी आमंत्रण मराठी दशक्रिया विधी निमंत्रण मेसेज मराठी Dashkriya vidhi message in marathi
Dashkriya vidhi in marathi Tervi nimantran Patrika in marathi Terava vidhi invitation in marathi Dashkriya vidhi Banner in marathi Dashkriya vidhi template in marathi
वर्षश्राद्ध
मागे दिलेले तेराव्या पर्यंतचे विधी यथासांग पार पडले की मग येते अब्दपुरीत श्राद्ध . अब्दपूरीत म्हणजे त्यादिवशी वर्षपूर्ती झाली त्याचे श्राद्ध ! जसे रेल्वेच्या पासवर सत्तावीस तारखेचा पास सव्वीसला संपते त्यानुसार ज्या तिथिस मृत्यू झाला त्याची आदली तिथि ही अब्दपूरीतासाठी घेतात . उदा. मृत्यू माघ कृष्ण दशमी असेल तर पुढील वर्षी माघ कृष्ण नवमीस अब्दपूरीत व दशमीस प्रथमाब्दिक म्हणजे पहिले वर्ष श्राद्ध होय . हे खरे तर कायम करावे असे शास्त्र सांगते परंतू किमान पहिले तीन वर्ष तरी पिंडदाना सह गुरूजी बोलावून करावे असे वाटते .
varsha shraddha in english varsha shraddha in marathi varsha shraddha tithi varsha shraddha message in marathi varsha shraddha meaning in english varsha shraddha invitation card in english varsha shraddha quotes in marathi varsha shraddha invitation card in marathi varsha shraddha patrika pratham varsha shraddha in marathi pratham varsha shraddha pratham varsha shraddha message in marathi pratham varsha shraddha patrika in marathi pratham varsha shraddha quotes in marathi Pratham varsha shraddha banner
पितृदोषाची लक्षणे
आता आपण वळूयात मूळ विषयाकडे पितृदोष ! वरील सर्व कर्मे करताना यत्किंतीतही तृटी चालत नाही जसे पुजेत एखादी वस्तू नसेल तर एेवजी अक्षता वाहतात तसे इथे चालत नाही . त्यामुळे वा गुरूजींनी दिलेली माहिती नीट न समजणे , कधी कधी गुरूजी जे सांगतात ते व घरातील काही मंडळी हे आमच्यात नसते म्हणतात त्यामुळे तो विधी केलाच जात नाही याने पत्रिकेत पितृदोष येत असतो . हे अनेक पिढ्या मागे चालत आलेले असते . जसा एखादा आजार एकदम उद्भवत नाही त्याची लक्षणे आधी दिसतात व नंतर तो आजार जोर करतो अगदी तसेच हे असते !
१ ) घरातील कर्ता पुरूष अचानक मृत्यू पावणे .
२ ) घरातील तरूण मुलाचा अचानक काहीही न घडता साध्या कोणत्याही कारणाने अचानक मृत्यू होणे .
३ ) एेन जेवणाचे वेळी घरात भांडणे होणे व त्यामुळे अन्न वाया जाणे .
४ ) घरात चांगली केलेली पुण्यकृत्ये लागू न पडणे व आणखी वाईट होणे त्यामूळे श्रद्धा डळमळीत होणे .
५ ) दोन सख्य असलेले भाऊ (लग्नांनंतरही सख्य कायम ) अचानक वितूष्ट येऊन वेगळे होणे व अगदी हा मरावा इतका द्वेष वाढणे .
६ ) दोन भाऊ असता एकाचे खूप चांगले होणे व दुसरा अगदी दरीद्री बनणे व योग्य असूनही नोकरी , विवाहात नाकारले जाणे .
७ ) घरात अनेक जण किंवा काही जण अविवाहित असणे व घराण्यात संतती नसणे .
८ ) पैसा योग्य कारणासाठी खर्च न होता तो अचानक उद्भवलेल्या आजारपण अॅक्सीडेंन्ट यावर खर्च होणे व कर्ज काढावे लागणे .
९ ) विविध प्रकारची भितीदायक स्वप्ने पडणे ज्यात घरातील वडिलमंडळी खायला मागत आहेत असे दिसणे .
१० ) तिर्थयात्रा , तेथे केलेली श्राद्धे लागू न पडणे .
११ ) घरात पुरेसे अन्नधान्य भरूनही ते न पुरणे वा बनवलेले वाया जाणे . ( हे अन्न बाहेर टाकल्यावर कोणताही प्राणी खात नाही ).
१२) घरात काही देवाचे कार्य वा शुभकार्य ठरले की नेमक्या अडचणी उभ्या रहाणे वा ऐनवेळी भांडणे होणे व केलेल्या कार्याचे समाधान साध्य न होणे .
१३)घराण्यात कुटूंब विभक्त होणे व होणारी कार्ये बंद पडणे .
१४) घरात वडिलधारी मंडळी काहीही मार्गदर्शन करण्यासाठी शिल्लक न रहाणे .
१५) हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या सुरू होणे पण मध्येच खीळ बसणे.
१६) घरातील मुलगा / मुलगी सर्व काही योग्य असूनही विवाह न होणे .
१७) जोडप्यात कोणताही दोष नसताना व डाॅ. इलाज सुरू असूनही संतती न होणे / संतती न वाचणे / वारंवार गर्भपात होणे / संततीत व्यंग असणे / मतीमंद संतती जन्माला येणे.
------ पितृ ऋण से मुक्ति के उपाय पितृ दोष निवारण के सरल उपाय कुंडली में पितृ दोष कैसे बनता है पितृ दोष क्यों होता है पितृ दोष शांति के अचूक उपाय पितृ दोष क्या होता है
श्रद्धा
आपल्याला होणारी संतती ही फक्त आणि फक्त पितरांच्या आशिर्वादानेच होते ! जर संतती होत नसेल तर जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा तीन पिंड असतात त्यातील दोन नंबरचा ( मधला) पिंड संतती न होणाऱ्या स्त्रीस खाण्यास देतात !
आपण जी दीपावली करतो ती देखील पितरांसाठीच असते . नुकतेच महालय व पितृपंधरवडा आटोपलेला असतो . यानंतर कोजागीरीस आकाश दीपदान करतात अर्थात आकाश कंदील लावतात .मग सुरू होते दीपावलीची धामधूम . यात पितरांस आम्ही खूप सुखी आहोत हे दाखवणे हा हेतू असतो . याचवेळी दक्षिणेकडे दीपदान करतात . यमतर्पण करतात .
उपाय
या पितृदोषासाठी त्रीपिंडी , नारायण बली , नागबली , केला जातो . तसेच आणखीही काही सोपे उपाय आहेत तेही केल्याने फायदा मिळतो . नारायण बली व नागबली हे दोन स्वतंत्र विधी आहेत . तीन दिवसात पहिले नारायण बली , दुसरी नागबली व तिसरे दिनी गणेशपुजन पुण्याह वाचनादी कर्म व नवग्रहांचे हवन केले जाते . त्रीपिंडी हा विधी एकाच दिवसात करता येतो.वरील विधी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर , नाशिक , नरसोबाची वाडी , वाराणसी , गोकर्ण महाबळेश्वर , गया प्रयाग , आदी ठिकाणी स्थान महात्म्यामुळे केला जातो . तसेच जेथे तुलसीची वने आहेत तेथे , वडाचे झाड , तलाव व श्री शिवमंदिर , संगमस्थान , समुद्र किनारा , पिंपळवृक्ष व शिवाचे मंदिर व नदी संगमाचे ठिकाणीही हा विधी केलेला चालतो . हल्ली हा विधी हरीहरेश्वर येथेही करतात .
नारायण बली
नारायण बली . हा विधी घरात कोणाचा अपमृत्यू , अपघाती , आत्महत्या , खून , दिर्घ आजार , पाण्यात बुडून , भाजून , चोरांनी मारून इत्यादी प्रकारे मृत्यू झाला असल्यास त्याचा दोष जाऊन आत्यास गती मिळावी यासाठी केला जातो. तसेच घरातील मागील पिढीत दशक्रियादी कार्ये नीट झालेली नसतील त्या सर्वांचा , घरातील न केल्या गेलेल्या श्राद्धांचा सर्व प्रकारचे सात पिढीतील दोष पित्या कडून व माते कडून आलेले नाहीसे होतात . तसेच हा विधी वडिल आई हयात असतानाही मुलास करता येतो .
या विधीची सुरूवात गंगा स्नानाने होते . तेथे गंगेची पुजा वगैरे करून त्या जलस्त्रोतास वंदन करून हे कर्म आज सुरू करीत आहोत हे सिद्धीस जावो असे आशिर्वाद मागून भस्म स्नान व मृत्तीका स्नान व पुन्हा गंगा स्नान केले जाते . यावेळी सफेद वस्त्र नेसायचे असते . एकट्या पुरूषानेही हा विधी केला तरी चालतो तसे समस्त कुटूंबीय तेथे हवेतच असेही काही नसते यासाठी एकटा माणूसही हा विधी जाऊन करून येऊ शकतो .
यानंतर ओलेत्यानेच शिव मंदिरास प्रदक्षिणा घालून तेथील कुंडावरून पाणी भरून स्मशानात जातात . येथे . ब्रह्मा , विष्णू , महेश , यम व प्रेत या पंच प्रतिमांचे ( या प्रतिमा अनुक्रमे सोने , चांदी , ताम्र , लोह व शिसे यांच्या असतात ) पंचकलशांवर स्थापना करून षोडषोपचारे पुजन केले जाते . प्रेताचे पुजन करून यथाविधी त्याचे दहनादी कर्म केले जाते . त्या अनुषंगाने येणारे दशक्रियादी विधी केले जातात . नंतर त्या दहन केलेल्या पुतळ्याची राख वगैरे सावडून पाण्यात विसर्जीत करतात या दिवशी व पुढील तीन दिवस सुतक पाळतात .
---- narayan bali puja cost narayan bali book pdf narayan bali vidhi narayan bali puja at home narayan bali puja at srirangapatna cost narayan bali puja samagri list narayan bali in garuda purana narayan bali in hindi narayan bali mantra moksha narayan bali puja cost gokarna narayan bali cost gokarna narayan bali pooja moksha narayan bali puja in gokarna narayana bali narayana bali pooja cost narayana bali pooja in srirangapatna narayana bali pooja in kannada narayana bali pooja in telugu
नागबली
तीन दिवसाचे सुतक संपले की चौथ्या दिवशी नागबली करतात . या दिवशी ब्रह्मा , विष्णू , महेश , काल व सर्प या पंच देवतांचे षोडषोपचारे पुजन होते . नंतर सर्पाचे दहनादी विधी होऊन अष्डपींड दान केले जाते . पुन्हा सायंकाळी राख वगैरे सावडून पाण्यात विसर्जीत करतात . हा विधी घराण्यात कोणी सर्प मारला असेल किंवा चुकून अपघाताने मारला गेला असेल तर त्याचे दोष जाण्याकरीता करतात . कुंडलीतील सर्प दोष ( कालसर्प ) याने जातात .
याचे तीन दिवसांचे सुतक संपले की चौथ्या दिवशी आंघोळ वगैरे उरकून गुरूजींच्या घरी गणेशपुजन , पुण्याहवाचन , नवग्रह पुजन केले जाते याचे वैशीष्ट्य असे की जर तुमची जन्मनक्षत्र शांती झाली नसेल तर ती ही यातच होते इतके हे पुजन महत्वाचे असते . यानंतर भोजन वगैरे झाले की गुरूजींना ठरलेली दक्षिणा व ऐपती प्रमाणे दाने किंवा त्या ऐवजी यथाशक्ती दक्षिणा देतात .
हल्ली हा विधी फक्त तीन दिवसात उरकला जातो परंतु ते शास्त्र संमत आहे .
------------------- nagbali pooja nagbali puja nagbali nagbali pushp nagbali pooja in hindi nagbali pooja trimbakeshwar nagbali shanti nagavalli movie nagabali hindi movie nagavalli film narayan nagbali nagbalik loob in english pagbabalikwas kahulugan nagbalik in english nagbalik lyrics nagbalik ang tatlong prinsipe ibong adarna nagbali vidhi nagisa bali nagbali place nagpur to bali flight nagisa bali bay view villas
पितृदोष जाण्या करीता श्री गुरूचरीत्राचा वीस आणि एकवीसावा अध्याय वाचल्याने ही श्री गुरूकृपेने पितर संतुष्ट होऊन त्यांना गती प्राप्त होते .
गुरूचरित्र (Marathi)
सरस्वती गंगाधर स्वामी
गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.
अध्याय विसावा
ऐसें परिसुनी विप्र । म्हणे तेथें कोणा वर । लाधला बोला सविस्तर । ऐकें उत्तर सिद्ध म्हणे ॥१॥
एक दशग्रंथी विप्र । शिरोळग्रामीं मृतपुत्र । तद्भार्येसी एक विप्र । सांगे उग्रकर्मविपाक ॥२॥
त्वां ब्रह्मस्वशत घेतलें । तया पिशाचत्व आलें । त्याणें तुझे सुत मारिले । कर्म केलें पाहिजे त्याचें ॥३॥
दे द्रव्य दद्गोत्रासी । सेवीं मास एक गुरुसी । येरु म्हणे न मजपाशीं । द्रव्य गुरुसी सेवीं भावें ॥४॥
अभयंकर रक्षु ऐसें । म्हणूनी सेवितसे । स्वप्नीं भूत मारीतसे । राखीतसे गुरु तिसी ॥५॥
सांगे तत् परिहार जसा । जागेंपणें करी तसा । तेणें मुक्त झाला पिसा । गुरु प्रसाद दे तिला ॥६॥
ती दोन पुत्र प्रसवे । ते दोघे दिसती बरवें । थोर होतां व्रत करावें । म्हणुनी वेचिती ते द्रव्य ॥७॥
श्रेष्ठ तनयाचें व्रत । आरंभिता धनुर्वात । होवोनि तो वांकत । सन्निपात न शमें यत्नें ॥८॥
तो तद्भावें फिरवी नेत्र । मरे होतां अर्धरात्र माता रडे पिटी गात्र । बोधमात्र नायके ती ॥९॥
दिवस मध्यान्हीही येतां । जाळाया ती न दे प्रेता । ब्रह्मचारी स्पष्टवक्ता । तेथें येतां झाला तेव्हां ॥१०॥
इति श्री०प०प०वा०स०गु० समंधपरिहारो नाम विंशो०
अध्याय एकविसावा
तो होय गुरुनाथ । तियेप्रति सांगे हित । कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥
पृथ्व्यप्तेजोवाताकाश । हेच आले आकारास । मायामय संबंधास । तूंचि खास रडशी कीं ॥२॥
जरी सूनू तुझा हाची । पूर्वापर असे साची । सांग कथा प्राग्जन्माची । तूं कोणाची स्त्री की माता ॥३॥
जैं सूर्योदयास्तानें । नित्य दिन रात होणें । तेवीं कर्में जन्ममरणें । भोगणें सुखदुःख ॥४॥
कोणी नहें निवारिती । गुणमय ते मरती । देवादिकां हीच गती । मेला मागुती न ये शोके ॥५॥
दे हा शव जाळावया । ती म्हणे जो दे अभया । बाध ये कीं त्याच्या वाक्या । कोण तया पुढें भजे ।
सांगे शांत ब्रह्मचारी । हें जा पूस औदुंबरी । येरु शव बांधुनी उदरीं । पादुकेवरी शिर हाणी ॥७॥
बोल कोणाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना । पतिअह ती अंगना । आक्रोशना करीतसे ॥८॥
स्वप्नी नको रडूं म्हणून । स्वामी देती आश्वासन । पाहे जगी होवून । पुत्र संजीवन झाला ॥९॥
विप्र पाहांटेस आले । त्यांणीं नवल हें ऐकिलें । सर्वां आश्चर्य तें झालें । असें झालें वाणूं किती ॥१०॥
इति श्री०प०वा०स० सारे मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशो०
My Mother Passed away to Heaven on 06/06/12.
Dashkriya Vidhi : On Friday 15/06/12 8.30 am. At Ramghat, Godavari River, Nasik.
Terwa/ Gandh Mukti & Prasad Bhojan: On Monday, 18/06/2012. 12:30 Noon., Place- Vitthal Mandir, Bhandi Bazar, Nasik.
Maze pappa kai k d sanap yanche nidhan 18 9 2015 roji zale tyancha dashkriya vidhi 27 9 2015 rozi tigaon tal sangamner yethe hoiel
Eshwar tyanchya aatmyas chirshanti deo !
Amche mama Kai. Kondiba lashkare yancha dashkriya vidhi Friday LA dhavalpuri tal parner
Amchya sasubaincha. Dashkriya vidhi udya paithan yethe aahe
My Grandfather (BABA) Expired on 04/06/2019 His 10th day (Dashkriya vidhi) held on 13/06/2019 At. Post. Dhamangaon Awari Tal. Akole, Dist. Ahamadnagar.
Aamche chulte shree Tulshiram khanduji kamthe yancha alpasha aajarane dukhad nidhan jhale.dashkriya vidhi udya 23.9 2014 mangalvar sakali 8 vajta yewale wadi yethe hoil.
Dashkriya vidhi,Shradhanjali,tervi-dashkriya-vidhi invitation
Dashkriya-Tervi-Varsh shradh Invitation card
free online Marathi tervi vidhi/dashkriya vidhi invitation card
dashkriya vidhi quotes in marathi
dashkriya vidhi banner hd
dashkriya vidhi template
dashkriya vidhi marathi
dashkriya vidhi list in marathi
dashkriya vidhi banner background in marathi
dashkriya vidhi in hindi
dashkriya vidhi details in marathi
dashkriya vidhi quotes in marathi
dashkriya vidhi invitation in english
dashkriya vidhi template
dashkriya vidhi marathi
dashkriya vidhi banner hd
dashkriya vidhi list in marathi
dashkriya vidhi invitation in marathi app
No comments:
Post a Comment