Maharashtrian Jewellery
एखादा दागिना टीव्हीवर एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंगावर दिसतो आणि लगेच लोकप्रिय होतो. त्या दागिन्याचे डिझाइन, त्याचा पोत याबद्दल स्त्रियांमध्ये चर्चा व्हायला लागते. पण त्याहीपलीकडे आपल्याला माहीत नसलेले कितीतरी पारंपरिक दागिने एकेकाळी वापरले जात. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या, पण आज कालबाह्य़ झालेल्या अशा काही खास पारंपरिक दागिन्यांची ओळख..
माथ्यावरचे अलंकार

हे सोन्याचे एक जोडफूल असते. वेणीचा शेपटा घातल्यानंतर केसांची टोके (अग्रे) या जोडफुलाच्या मधल्या पोकळ जागेत खोचून घ्यावयाची व खालून वर गुंडाळत गुंडाळत शेपटय़ाचे गोल वेढे अगदी वर शेपटय़ाच्या प्रारंभस्थानी आणून तेथे आकडय़ांच्या अथवा आगवळाच्या साहाय्याने पक्के बांधून खोपा तयार केला की हे फूल खोप्याच्या मध्यभागी दोन्ही बाजूंनी दिसत राहते.

कमळ म्हणजे फूल. आपल्या अलंकारामध्ये फुलाच्या आकृतीचे अलंकार ‘कमळ’ अथवा ‘फूल’ अशा दोन्ही नावाने ओळखले जातात. असे कमळ आकडय़ाच्या साहाय्याने डोक्यावर मागच्या बाजूच्या अंबाडय़ावर खोवण्याची प्रथा आहे.

हाही खास वेगळा असा अलंकार नव्हे. हे एक पदक आहे आणि ते साज या अलंकारामध्ये असते. साजामधली किती तरी पदके सुटय़ा सुटय़ा आकारात करून शुभचिन्ह म्हणून माथ्याच्या पुढच्या बाजूला भांगसराच्या शेवटी टोकावर अडकवून ती कपाळावर रुळविण्याची पूर्वी पद्धत होती.

डोक्यावर नगगोंडे म्हणून विविध अलंकारांचा एक संच माथ्यावरून मागच्या बाजूला खाली उतरवला जातो त्या संचामधला हा एक सुवर्णालंकार आहे. या संचामध्ये तो हमखास असतोच. तो स्वतंत्रपणे सुटा लावला जात नाही.

हा अलंकारांचा संच नगगोंडेप्रमाणेच गोंडेबारे, गोंडेफुल अशा नावांनीही ओळखला जातो. या संचाला माथ्यावर नाग या अलंकारापासून प्रारंभ होतो. नागाच्या खाली चंद्र, त्यानंतर केकत किंवा केवडा पान, त्याच्या पुढे राखडी आणि राखडी पदकाच्या खाली वेणीच्या शेपटय़ावर थोडय़ा थोडय़ा अंतराने जडवलेली सुवर्णाची सात फुले व अगदी शेवटी टोकाशी सोन्याची टोपणे असलेले गोंडे, असा हा एकूण संभार असतो. अशा पद्धतीने अलंकार जडवलेला वेणीचा शेपटा मागच्या बाजूने खालपर्यंत रुळत राहतो, परंतु शेपटय़ाऐवजी, शेपटा गुंडाळून वेणीचा चक्राकार खोपा केला, तर मात्र ही फुले चक्राकारी शेपटय़ाच्या वर दिसतील अशी जडवली जातात आणि मूद या अलंकाराच्या साहाय्याने हा चक्राकार खोपा वर एकत्रित बांधून ठेवण्याची तजवीज केलेली असते.

स्त्रियांच्या माथ्यावर भांगावरून कपाळापर्यंत येणारा मोत्यांचा भांगसर व त्याच्या खालच्या टोकाशी कपाळावर रुळणारा बिजवरा नावाचा चंद्रकोरीचा अलंकार आहे, तर मागील बाजूस नगगोंडे या संचामध्ये नागाच्या खाली लगेच चंद्रकोर शोभत असते. माथ्यावर पुढच्या बाजूला भांगरेषेच्या डाव्या-उजव्या दोन्ही बाजूंना चेहऱ्याच्या उजवीकडे सूर्य आणि डावीकडे चंद्र अशी रत्नजडित पदके शोभा देत असतात.
जाळी (मोत्याची)- Motyachi jali
ओवलेल्या मोत्यांचे सर उभे-आडवे एकमेकांत ठरावीक अंतर सोडून एकत्र गुंफून एक जाळीदार छोटासा मोत्यांचा पट संपूर्ण माथ्यावर घातला जातो, त्याला मोत्यांची जाळी असे नाव होते. पूर्वी नववधूला नटविताना हा अलंकार घातला जात असे, परंतु हल्ली अशी जाळी डोक्यावर घालण्याची आवड स्त्रियांनाच राहिलेली नाही. त्यामुळे हा दागिना दिसत नाही.

हा अतिशय सुरेख कलाकृतीचा सुवर्णाचा दागिना आहे. नागाच्या फण्यापासून तो शेपटीच्या टोकांपर्यंत जणू काही सळसळणारा नाग असावा तसा हा अलंकार वेणीच्या वरच्या प्रारंभापासून खाली टोकापर्यंत वेणीवर रुळत असतो. या दागिन्याचे सर्व मणके सुटे सुटे असून ते एकमेकांना लहानशा गोलकडय़ांच्या साहाय्याने जोडलेले असतात. त्यामुळे सहज हालचालीमुळे वेणीचा शेपटा कसाही हलला तरी त्याच्याबरोबरच हा सोन्याचा नागही हलत राहतो.

सोन्याचे कमळाकृती फूल. केसांमध्ये अडकवण्यासाठी या फुलाच्या मागच्या बाजूला तारेचीच स्प्रिंगसारखी रचना (फिरकी) करून ती जोडलेली असते.

बिजवरा म्हणजे द्वितीयेची चंद्रकोर. ही चंद्रकोर (अलंकार) रत्नजडित असून ती भांगरेषेवर असणाऱ्या मोत्याच्या भांगसराच्या खाली टोकाशी कपाळावर लोंबेल, अशा रीतीने हा अलंकार लावण्यात येतो.
भांगसर- Bhangsar
माथ्यावरच्या भांगरेषेवरून पुढे कपाळापर्यंत जाणारा मोत्यांचा सर ‘भांगसर’ या नावाने ओळखला जातो. पुढे टोकाशी खाली कपाळावर लोंबणारे चंद्रकोरीच्या आकाराचे रत्नजडित पदक या सराला जोडलेले असते व ते ‘बिजवरा’ या नावाने ओळखले जाते हे सांगितले आहेच. बिजवऱ्याप्रमाणेच या सराला कासव, मोर, कीर्तिमुख, भुंगा इत्यादी ‘साजा’मधील इतर पदकेही जोडली जातात.

माथ्यावरून कपाळावर लोंबणारा बोरासारखा गोल टपोरा असणारा हा अलंकार राजस्थान मारवाडामधून इकडे आला. परंतु महाराष्ट्रात डोक्यावरून खाली संपूर्ण चेहरा झाकणारा पदर घेण्याची पद्धत नसल्यामुळे येथे तो फारसा रुजला नाही. डोक्यावर नेहमी पदर घेणाऱ्या इथल्या काही जमातीमध्ये तो आजही कधी कधी दिसतो एवढेच. उत्तर भारतात या दागिन्याला बोर म्हणतात पण महाराष्ट्रामध्ये बोराप्रमाणेच ‘आवळा’ या नावानेही तो ओळखला जातो.

कळसाच्या आकाराचा हा सोन्याचा अलंकार आगवळाच्या साहाय्याने, डोक्याच्या मागच्या बाजूला केसांच्या बुंध्याशी किंवा वेणीच्या प्रारंभस्थानी बांधला जातो. वेणी न घालता नुसतेच मोकळे केस सोडले, तरी ते अस्ताव्यस्त पसरू नयेत यासाठी प्रारंभस्थानापाशीच रेशमी दोऱ्याच्या साहाय्याने ते एकत्र बांधून ठेवण्यासाठी हा अलंकार निर्माण झाला असावा. (आजच्या जमान्यातील स्त्रिया या मुदीऐवजी ‘रबरबॅण्ड’ किंवा ‘प्लॅस्टिक क्लिप’चा वापर करतात.)

वेणीच्या संचामध्ये केवडय़ाच्या खाली लावण्याचा हा एक गोल वर्तुळाकारी पदक रूपातला सोन्याचा अलंकार आहे. राखडी हे सूर्याचे प्रतीक समजले जाते. उत्तर भारतात सर्वत्र हा अलंकार प्रचलित आहे. आपल्या महाराष्ट्रात वेणीवरच्या संपूर्ण अलंकार संचात हा दागिना वापरात असावयाचाच, परंतु पुष्कळदा हा सुटा अलंकारच मुदीच्या जोडीने येथे वापरला जात असे.

माथ्यावर अगदी उंच जागी हे सोन्याचे फूल लावले जात असे. टपोरे मोठय़ा आकाराचे हे कमळाकृती फूल बांधण्याची पद्धत होती. हा उत्तर भारतामधला अलंकार असून तिकडे त्याला ‘चोटी फूल’ असेही नाव होते.

मोराच्या आकृतीचे हे सुवर्णपदक, कपाळावर भांगसराच्या खाली, मागच्या बाजूला आकडय़ाच्या साहाय्याने अंबाडय़ावर, नागवेणीमध्ये प्रत्येक मणक्यावर, पुरुषांच्या मुकुटावर, तसेच स्त्रियांच्या चंद्रहार या अलंकारांच्या प्रारंभस्थानी मोराचे पदक जडवलेले असते.
हे झाले शिर म्हणजे माथ्यावरचे अलंकार. आता मुखावरचे म्हणजे नाक आणि कान यांचे अलंकार पाहू.
नाक Nak for Nose
आपल्या धर्मामध्ये कान टोचणे (कर्णवेध) हा एक संस्कार सांगितला आहे. त्यामुळे कान या अवयवाला विविध ठिकाणी भोके पाडून त्यामध्ये वेगवेगळे अलंकार घालण्याची प्रथा येथे फार प्राचीनकाळापासून चालू आहे. परंतु नाक टोचणे ही गोष्टच आपल्या धर्मात नव्हती. त्यामुळे प्राचीनकाळी नाकासाठी अलंकार ही प्रथा येथे कधी नव्हती. नाक टोचून त्यात नथ, चमकी, सुंकले वगैरे दागिने घालणे ही बाब आपल्याकडे तशी अलीकडच्या म्हणजे गेल्या हजार एक वर्षांपासून सुरू झालेली आहे. ही प्रथा अथवा चाल येथे मुसलमान धर्मीय आक्रमकांनी आणली.

हा भारताबाहेरचा आणि भारतात अवतरण्यापूर्वीच्या प्राचीनकाळापासूनचा मध्य आशिया प्रदेशातला अलंकार. मुसलमानांच्या आगमनाबरोबरच तो तिकडून भारतात आला. मात्र हा अलंकार नाकपुडीमध्ये न घालता दोन्ही नाकपुडय़ांच्या मधल्या मांसल पडद्याला भोक पाडून त्यात अडकविला जातो. महाराष्ट्रामधल्या मुस्लीमधर्मीय स्त्रिया आजही याच पद्धतीने हा अलंकार घालतात.

हाही बुलाक अलंकाराचेच जरा वेगळे रूप असणारा मुस्लीम अलंकार असून तोसुद्धा बुलाकप्रमाणेच दोन्ही नाकपुडय़ांच्या मधल्या भागात अडकवला जातो.

चमकीप्रमाणेच परंतु चमकीच्या वर दिसणारा मोती अथवा रत्नखडा याऐवजी चंद्राकाराच्या कोंदणात बसवलेले रत्न व कोंदणाला जडविलेले मोती, अशा रूपाकारातली ही चमकीच, असे म्हणणे योग्य ठरते. या मुरकीच्या खालच्या बाजूला मळसूत्र असते व त्याच्या योगाने ही मुरकी एका जागी घट्ट (स्थिर) राहू शकते. ही मुरकी नेहमीप्रमाणेच कानामध्येही घालण्याची पद्धत आहे. या मुरकीलाच काही ठिकाणी ‘मोरणी’ असेही म्हणतात.
कान ear Kan

कानामध्ये खाली पाळीच्या भोकात अडकवण्याचा हा रत्न व मोतीजडित असा फुलाच्या (कमळाच्या) रूपाकाराचा कुडी या अलंकाराचाच एक वैभवशाली प्रकार.

काप याचा अर्थ तुकडा (र’्रूी). मी दोन प्रकारांचे काप पाहिले. एक काप रत्नजडित असा चंद्रकोरीच्या आकाराचा असून त्याला मोत्यांचे वेल (सर) जोडलेले होते, तर दुसरा काप नुसता सोन्याचा वाटोळा दाणा असून त्याला कुडय़ांप्रमाणेच खाली मळसूत्राचा जोड असतो. मराठी भाषेत ‘काप गेले पण भोके राहिली’ अशी जी म्हण आहे ती या कापाच्या संदर्भात खरी वाटते.

हा लहानसा कुडीचाच एक प्रकार, परंतु कानाच्या पाळीवर मध्यभागी घालण्याची प्रथा होती. ‘लहानशी कुडी’ या अर्थानेही. या दागिन्याला ‘कुर्डु’ हे नाव मिळाले असावे.

हासुद्धा एक छोटा अलंकार अधूनमधून कुर्डुऐवजी कानाच्या पाळीवर कुर्डुच्याच जागी घातला जातो. याला ‘खुंटबाळी’ असा दुसराही शब्द वापरात आहे.

हा सुवर्णाचा एक देखणा अलंकार. कोकणामध्ये कोळी जमातीच्या स्त्रियांच्या वापरात आहे. त्याशिवाय ‘गाठा’ या नावाचा दुसराही छोटासा अलंकार मत्स्य प्रतीक म्हणून या जमातीत लग्नप्रसंगी घातला जातो. तो जणू काही ‘सौभाग्यचिन्ह’ असल्याचा महत्त्वाचा मानला जातो.
चौकी किंवा चौकडा- Chauki or Chaukada
चारच मोती किंवा चार सोन्याचे दाणे असणारा हा कुडीचाच एक प्रकार चौकी-चौकडा या नावाने ओळखला जातो.
चारच मोती किंवा चार सोन्याचे दाणे असणारा हा कुडीचाच एक प्रकार चौकी-चौकडा या नावाने ओळखला जातो.

हा कानातील एक लोंबता अलंकार आहे. तो सुटाच वापरला जातो किंवा त्याला मोत्याचा वेल जडवून त्यासह तो कानात घातला जातो.

चंद्रकोरीच्या आकाराचा हा कुडीच्या स्वरूपातला अलंकार कानात त्याचप्रमाणे नाकातही घातला जातो. वर नाकातील अलंकारांच्या माहितीत हे नवे नाव दिले आहेच.

हा काही वेगळा खास अलंकार नव्हे, तर अलंकाराऐवजी पर्यायी वापरासाठी केलेला हा छोटासा दागिना आहे. मुख्यत: नाक आणि कान यांची भोके बुजून जाऊ नयेत या हेतूने त्या भोकांमध्ये लवंगेच्या रूपाकाराची एक सोन्याची अथवा चांदीची काडी घालून ठेवतात तिला ‘लवंग’ असे म्हटले जाते.
गळा Neck - Gala
अंबर माळ- Ambar Mal
अंबर हे एक खनिज आहे. याचा रंग पिवळा-नारंगी अथवा किंचित तपकिरी असतो. अंबराचे मणी बनवून त्यांची माळ गळय़ात घालण्याची येथे हजारो वर्षांची प्रथा आहे. मराठय़ांच्या राजवटीत या माळेला ‘अंबरसा’, ‘आमरसा’ असेही म्हणत असत.

सोन्याच्या टपोऱ्या आकाराचे मणी एका सरात गुंफून तयार केलेली माळ एकदाणी या नावाने ओळखली जाते. त्याशिवाय एकदाणीप्रमाणेच ‘एकलड’, ‘एकसर’, ‘एकावळी’ अशीही नावे प्रचारात आहेत.

महाराष्ट्रामधील शैवपंथीय सारस्वत जमातीमधले हे मंगळसूत्र ‘काशीताळी’ या नावाने ओळखले जाते. या अलंकारात सोन्याचे व पोवळय़ाचे मणी ओवलेले असून माळेच्या केंद्रभागी चौकोनी आकाराचे मुख्य पदक असते व ते ‘ताळी’ या नावाने ओळखले जाते. गोवा प्रदेशात हिंदूधर्मीय स्त्रियांप्रमाणेच ख्रिश्चन स्त्रियांमध्येही हा अलंकार ‘सौभाग्यचिन्ह’ म्हणून वापरात आहे.

कारल्याच्या आकाराचा म्हणजे मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूंच्या टोकांकडे निमुळता होत गेलेला सोन्याचा ठसठशीत लांबट मणी कारले या नावाने ओळखला जातो. असा मणी एखाद्या माळेच्या मध्यभागी जडवून ती माळ गळय़ात घातली जाते.
गरसळी- Garsali
मूळ शब्द गळेसर (गळय़ात घालावयाची माळ) असा असावा, परंतु या शब्दाची गळसरी, गळेसर, गरसळी, गरसुळी, गरसोळ अशी अनेक अपभ्रष्ट रूपे या माळेसाठी बहुजन समाजाच्या वापरात आहेत. सोन्याच्या कोणत्याही माळेला गळसरी, ‘गरसळी’ या नावाने ओळखले जाते.

मंगळसूत्रालाच गाठले असा शब्द ग्रामीण भागात रूढ आहे. गाठले, डोरले, गुंठण असेही शब्द या अलंकारासाठी ग्रामीण समाजात रूढ आहेत.
गुंजमाळ- Gunj Mal
सोन्याच्या तारेत गुंजांची गुंफण करून अशुभ निवारणासाठी हा दागिना गळय़ात घातला जातो.
सोन्याच्या तारेत गुंजांची गुंफण करून अशुभ निवारणासाठी हा दागिना गळय़ात घातला जातो.
गोखरू माळ- Gokharu Mal
गोखरू हे काटेदार फळ आहे. या गोखरूच्या आकाराचेच काटेदार सोन्याचे मणी करून त्यांची बनविलेली माळ, असा हा अलंकार आहे.
गोखरू हे काटेदार फळ आहे. या गोखरूच्या आकाराचेच काटेदार सोन्याचे मणी करून त्यांची बनविलेली माळ, असा हा अलंकार आहे.

गहू या धान्याचे व त्याच रूपाकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची तयार केलेली माळ, तिला ‘गव्हाची माळ’ असे म्हटले जाते.

चाफ्याच्या कळीसारखे सोन्याचे लांबट मणी तयार करून त्यांची बनविलेली ही माळ असते. पूर्वी या माळेला ‘सोनकळी माळ’ असेही म्हणत असत.

हा मूळचा कर्नाटकातील दागिना आहे. महाराष्ट्रात चिंताक या मूळ शब्दाऐवजी चित्तांग या नावाने तो ओळखला जात असे. लहान मुलांच्या मनगटामधल्या ‘बिंदल्या’प्रमाणेच परंतु मोठय़ा आकाराचा असा हा गळय़ात अडकवण्याचा दागिना होता. ‘सुवर्ण नियंत्रण कायदा’ अमलात येण्यापूर्वी (१९६२) हा दागिना येथे पुष्कळ ठिकाणी दिसत असे. आता मात्र तो पूर्णपणे लुप्त झाला आहे.

चौसरा म्हणजे सोन्याच्या बारीक कडय़ांचे गुंफलेले चार पदर असणारा हार किंवा माळ असा हा अलंकार होता. हजार वर्षांपूर्वीपासून तो इथे महाराष्ट्रात सर्वत्र दिसत असे. परंतु पुढे पुढे त्याचा वापर कमी कमी होत गेला. आता तो सुवर्णरूपात कोठे दिसत नाही, परंतु आदिवासी जमातीमध्ये मात्र आजही तो ‘चौसरा’ या नावानेच परंतु हलक्या जातीच्या धातूच्या स्वरूपात वापरात आहे.
जवमाळ- Javmal
जव म्हणजे यव किंवा सातू या दाण्याच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांची माळ असा हा दागिना आहे.
जव म्हणजे यव किंवा सातू या दाण्याच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांची माळ असा हा दागिना आहे.

कोणत्याही माळेच्या मध्यभागी लावला जाणारा सोन्याचा लांबट आकाराचा मोठा व पोकळ असा मणी. या मण्याच्या सर्वागावर अनेक भोके पाडून जाळी बनवलेली असते. कधी कधी ही भोके जरा अधिक मोठय़ा आकाराची करून त्यात बारीकबारीक रत्नखडेही बसवले असतात. वर ‘कारले’ या सांगितलेल्या अलंकाराप्रमाणेच माळेच्या केंद्रस्थानी अडकवला जाणारा ‘जाळीचा मणी’ हाही छोटासा अलंकार आहे.

जोंधळय़ाच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ ‘जोंधळी पोत’ या नावाने ओळखली जाते.

तांदळाच्या रूपाकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची केलेली माळ म्हणजे ‘तांदळी पोत.’
तिलडी- Tiladi
वर ‘एकलड’ या अलंकाराबद्दल लिहिले आहेच. एकलड म्हणजे मण्यांच्या एक सराची माळ. त्यावरूनच दोन सरांच्या माळेला दुलडी, तिलडी म्हणजे तीन सरांची माळ, चार सरांच्या माळेला चौसरा आणि पाच सरांच्या माळेला पंचलड अशी नावे आहेत.

अगदी बारीक केवळ सुती वा रेशमी दोरा आत जाईल एवढय़ा व्यासाच्या पोकळ सुवर्णाच्या नळय़ांचे लहान लहान तुकडे पाडून ते दोऱ्यात ओवून केलेली माळ नळय़ाची पोत म्हणून ओळखली जाते.
चिंचपेटी- Chinchpeti
छोटय़ा चौकोनी पेटीसारख्या सोन्याच्या कोदणात मोती आणि माणिक बसवून तयार केलेला अलंकार आजच्या घडीलाही लोकप्रिय आहे. ग्रामीण भागात ‘चीचपाटी’ या नावानेही तो ओळखला जातो. चिंचपेटय़ा या अलंकाराला पेटय़ा या नावानेही ओळखले जाते.

पेंडे- Pende
पेंडे हा शब्द जुडगा या अर्थाने वापरला जातो. मोत्यांचे अनेक सर असणाऱ्या माळेला ‘पेंडे’ असे म्हटले जाते.
पेंडे हा शब्द जुडगा या अर्थाने वापरला जातो. मोत्यांचे अनेक सर असणाऱ्या माळेला ‘पेंडे’ असे म्हटले जाते.

रायआवळय़ाच्याच रूपाकाराची सोन्याच्या मण्यांची माळ. या माळेलाच ‘हरपर रेवडी हार’ असा दुसराही शब्द प्रचारात होता.

दृष्ट निवारण्यासाठी एका विशिष्ट वेलीच्या बियांच्या रूपाकारासारखे मणी तयार करून त्यांची माळ गळय़ात घातली जाते तिला ‘वज्रावळ’ असे नाव आहे.
कंबर Waist Kambar

कमरपट्टय़ाचाच हा एक साधासुधा प्रकार. मुख्यत्वेकरून अशुभ बाधा निवारण्यासाठी कमरेवर बांधण्याची येथे जुनी प्रथा होती. पीळ दिलेले दोऱ्याचे सर आणि त्याला जोडलेले मणी असे या अलंकाराचे स्वरूप असते. हल्ली हा फारसा कोठे दृष्टीस पडत नाही.
हात Hand
हात म्हणजे बाहू, भुजा. या अवयवावर तीन ठिकाणी अलंकार घालण्याची रूढी आहे. पहिली जागा म्हणजे दंड. त्यानंतर मनगट आणि शेवटी हाताची बोटे. स्त्रियांच्या बाबतीत या तीनही जागा विविध अलंकार दृष्टीस पडतात. पुरुषांच्या किंवा मुलांच्या (शिशूंच्या) हातावर एवढे दागिन्यांचे ओझे नसते. स्त्रियांचे दंडावरचे दागिने असे आहेत-

हा दंडावरील चांदीचा अलंकार असून नागरजनांपेक्षा ग्रामीण भागांतील स्त्रियांमध्ये तो अत्यंत लोकप्रिय आहे आणि ‘तोळबंदी’, ‘तुळवंदी’ अशा काहीशा अपभ्रष्ट नावांनीच तो ओळखला जातो.

नागाच्या वेटोळय़ांप्रमाणेच दंडाभोवती रचना केल्याप्रमाणे दिसणारा हा अलंकार आहे. ग्रामीण भागात तो चांदीचा असून ठसठशीत दिसणारा असा असतो, तर शहरी भागात तो सोन्याचा व अधिक नाजूक कलाकुसरीचा दिसतो. या दागिन्याला ‘नागवाकी’, ‘नागोत्तर’ अशीही नावे आढळून आली.

ग्रामीण भागात दंडावरच परंतु जरासा खाली कोपराजवळ घातला जाणारा हा अलंकार आहे. कित्येक ठिकाणी त्याला ‘कोपरवाळी’ असेही म्हटले जाते.
मनगट

जव किंवा यव धान्याच्या दाण्याच्या आकाराचे सोन्याचे मणी सोन्याच्या बांगडीवर चिकटवून या बांगडीला उठाव आणला जातो, त्या अलंकाराला ‘जवे’ असे नाव आहे. हा मुळात गुजरात-राजस्थानकडील अलंकार. आपणाकडे त्याचा फारचा अढळ नाही. गुजरातेत ‘जवे’ आणि ‘पिछोडय़ा’ अशी जोडी असते. त्यापैकी जव ही बांगडी मनगटावरील सर्व अलंकारामध्ये अगदी पुढे घालावयाची आणि पिछोडी सर्वात मागे म्हणजे कोपरानजीक घालावयाची अशी तेथे पद्धत आहे.

हा मोत्यांचे सर एकत्र बांधून मनगटावर घालण्याचा अलंकार महाराष्ट्रात सर्वत्र रूढ नसला तरी अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो.
हाताची बोटे for hand fingers
भोरडी- Boradi
सोन्याच्या गोल वळय़ाला सोन्याच्याच बारीक तारेने संपूर्णपणे गोल गोल वेढे देऊन तयार केलेली अंगठी.
सोन्याच्या गोल वळय़ाला सोन्याच्याच बारीक तारेने संपूर्णपणे गोल गोल वेढे देऊन तयार केलेली अंगठी.

हा उत्तर भारतातून इकडे आलेला खास स्त्रियांसाठी असणारा अंगठीचा प्रकार आहे. आरसी म्हणजे आरसा असलेली अंगठी. एका वळय़ाला दर्शनी भागावर जडवलेली छोटीशी गोल आकाराची सोन्याची डबी आणि तिच्या झाकणावर तसाच छोटा गोल आरसा अशी या अंगठीची रचना असते. ही अंगठी फक्त डाव्या हाताच्या अंगठय़ावरच घालावयाची अशी पद्धत आहे. या डबीत सिंदूर किंवा कुंकू ठेवलेले असते. ऐन प्रसंगी, गरजेच्या वेळी या डबीतून कुंकू काढून व वरच्या आरशात पाहून ते कपाळी लावायचे यासाठी खास सुविधा म्हणून ही अंगठी.

ही एक अगदी वेगळय़ाच प्रकारची अंगठी ग्रामीण समाजामध्ये दिसून येते. विशेषत: कोकण-दाभोळ भागात त्याचप्रमाणे देशावर बारामती, अहमदनगर या भागातील ग्रामीण जनतेमध्ये तिचा वापर असल्याचे जाणवले. उच्चवर्णीयांमध्ये ही कोठेच नाही. ही अंगठी म्हणजे गोल वळे नव्हे.
पाय
अंदु (साखळय़ा) andu sakhalya-
अंदु हा कानडी शब्द आहे. हत्तीच्या पायातल्या भक्कम साखळीला अंदु हा शब्द वापरला जातो. महाराष्ट्रातही यादव काळापासून अंदु हा शब्द वापरात होता. नामदेवांचा अभंग- परब्रह्म निष्काम, तो हा, गौळिया घरी। वाक्या वाळे अंदु कृष्णा, नवनीत चोरी॥ हा अभंग आजही महाराष्ट्रात सर्वख्यात आहेच. शिवकाळात व नंतर हळूहळू अंदु शब्द मागे पडत चालला व साखळय़ा हा शब्द रूढावला. हा अलंकार पेशवेकाळात मराठे सरदारांनी राजस्थान, माळवा या प्रदेशातही नेऊन तेथेही तो लोकप्रिय केला. त्या संबंधात सविस्तर माहिती पुढे सातव्या प्रकरणात दिली आहेच.

छंद Chhand-
‘नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पायात घालावयाचे पैंजण’ असे या अलंकाराचे स्पष्टीकरण सुवर्णकारांकडून मिळते. तथापि तो प्रत्यक्षात कोठे पाहण्यात येत नाही.
‘नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पायात घालावयाचे पैंजण’ असे या अलंकाराचे स्पष्टीकरण सुवर्णकारांकडून मिळते. तथापि तो प्रत्यक्षात कोठे पाहण्यात येत नाही.

गोल मण्यांचा गजरा बनवल्यासारखा दिसणारा हा चांदीचा अलंकार असून देशभापेक्षा कोकणामध्ये याचा प्रसार अधिक असल्याचे दिसून येते.

तोडर हा संस्कृत शब्द आहे. तोडर हा प्राचीन काळापासून वापरात असलेला अलंकार आहे. मध्ययुगानंतरच्या काळात तोडर या मूळच्या शब्दाचे तोरडय़ा असे रूपांतर झाले. ह्य़ा तोरडय़ा आजच्या घटकेलाही अगदी लहान मुलांपासून मोठय़ा मुली, स्त्रिया यांच्या वापरात आहे.

पैंजण हा पर्शियन भाषेतील शब्द असून मुस्लिम धर्माच्या लोकांबरोबरच हा अलंकार भारतात आला. आजही मुसलमान स्त्रियांच्याच पायात तो महाराष्ट्रातही दृष्टीस पडतो. पेशवेकाळात तो ‘पायजीव’, ‘पायजिभी’ अशा अपभ्रष्ट रूपात इथल्या मराठी लोकांकडून उच्चारला जाऊ लागला होता.
पायाची बोटे for leg fingers
अनवट Anavat-
अनवट हा शब्द उत्तर भारत प्रदेशात प्रचलित आहे. पायाच्या अंगठय़ात चांदीचे जाडजूड व भक्कम कडे बसवलेले असते, त्याला ‘अनवट’ असे नाव आहे. महाराष्ट्रात अनवटप्रमाणेच ‘अनोठ’, ‘आनवटा’, ‘हणवट’ अशी अपभ्रष्ट शब्दरूपेही लोकांच्या बोलण्यात व लिहिण्यात आहेत. ‘अंगुस्ठा’ असाही एक शब्द या दागिन्याला लावला जातो. कन्नड भाषेत यासाठी ‘पोल्हारा’ असे नाव आहे आणि मराठा कालखंडातील सर्व वाङ्मय प्रकारात ‘पोल्हारा’ हा शब्द अनेकदा आढळून येतो.

(विरोल्या, विरवल्या)- जोडवी आणि विरोद्या ही हिंदू स्त्रिया ‘सौभाग्यचिन्हे’ मानतात. त्यापैकी विरोद्या पायाच्या दुसऱ्या बोटात, तर जोडवी ही पायाच्या तिसऱ्या बोटात घालण्याची सर्वसामान्य प्रथा आहे.

गेंद म्हणजे गुच्छ. जोडव्यालाच वरच्या बाजूला दोन-तीन लहान घुंगरे जोडली की त्याला गेंद असे नाव मिळते. या गेंद अलंकारालाच काही ठिकाणी ‘कांदेफुले’ असेही म्हटले जात असल्याचे मला आढळून आले आहे. त्याशिवाय या गेंद अलंकारालाच ‘विंचू’ असेही म्हणण्याची पद्धत काही ठिकाणी दिसून आली. उत्तर भारतात ‘बिच्छु’, ‘बिछवे’ म्हणून असाच एक अलंकार प्रचलित आहे, त्यावरून हे नाव येथे आले असावे असे वाटते.

पायात करंगळीमध्ये घालण्याचा जोडव्यासारखा अलंकार. याला ‘वेढे’ किंवा ‘वेढणी’ असाही शब्द प्रचलित आहे. हल्ली हा अलंकार फारसा आढळत नाही. पण करंगुळय़ा हा शब्द लावणी आणि लोकगीतात अनेकदा आढळला आहे.

माशाच्या रूपाकाराची उठावदार आकृती करून ती जोडव्याच्या वरच्या बाजूने लावली असते. या अलंकाराला मासोळी असे नाव आहे. महाराष्ट्रात नागर स्त्रियांमध्ये कमी परंतु ग्रामीण भागात स्त्रियांच्या बोटांमध्ये हा अलंकार सर्रास आढळतो. मासोळ्या पायाच्या चौथ्या बोटात घालण्याची प्रथा आहे.

पायाच्या मधल्या बोटात घालण्याचे चांदीचे वळे. कधी कधी एकाच बोटात दोन जोडवीही घातलेली दिसतात. त्यातील लहान जोडव्याला खटवे असे म्हटले जाते.
लहान मुलींच्या पायाच्या बोटात कसलाही दागिना घालण्याची पद्धत नाही. स्त्रियांच्या पायाच्या बोटांवर पहिला अलंकार चढतो तो जोडवे. पायाच्या मधल्या बोटावर विवाहप्रसंगी वधू जेव्हा गौरीहरा पूजते तेव्हा जोडवी घातली जातात आणि ती आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे.
माथ्यावरचे अलंकार
(‘आपले मराठी अलंकार’ या डॉ. म. वि. सोवनी लिखित आणि भारद्वाज प्रकाशन, पुणे प्रकाशित पुस्तकातून साभार.)
No comments:
Post a Comment