Friday, April 24, 2015

Marriage in Rs.1.25 - Savva rupayant lagna

शिर्डीत दरवर्षी अक्षयतृतीयेस सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जाते. अवघ्या 'सव्वा रुपयात' लग्न करण्याची सोय असलेला हा सामाजिक उपक्रम गेली १४ वर्षे अखंडपणे सुरू आहे. ... 

लाखो रुपयांची उधळपट्टी करून लग्नाचा डामडौल साजरा करण्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळ्यात अल्प खर्चात मुलामुलींचे विवाह करण्याचा उपक्रम राज्यात तीनेक दशकांपूर्वी सुरू झाला. हुंडा, मानपान, रुखवत, जेवणावळी या गोष्टी न परवडणारी अनेक कुटुंबं असतात, त्यांना यातून मोठा दिलासा मिळाला. यात प्रतिष्ठेचा प्रश्न येत नाही आणि मानापानाचाही. अनेक गावांत तर प्रत्येक लग्न सामुदायिक विवाहामध्येच करण्याचा प्रघात पडला आहे. 

शिर्डीत कैलासबापू कोते या सामाजिक कार्यकर्त्याने 'सव्वा रुपयात लग्न' लावून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेली १४ वर्षे तो अखंडपणे सुरू आहे. यंदाही अक्षयतृतीयेच्या गोरज मुहुर्तावर ५५ जोडपी लग्नाच्या रेशीमगाठी बांधणार आहेत. 

वैदिक व पौराणिक अशा दोन पद्धतीने विवाहसोहळा साजरा करण्याची रीत आहे. दोन्ही पद्धतीत थोड्याफार फरकाने विधीचे प्रकार सारखेच असतात. सुपारी फोडणे, मुहूर्त पाहणे, साखरपुडा, देवप्रतिष्ठापना , हळदी, सीमांत पूजन असे अनेक विधी... समाज आणि स्थानिक पद्धतीनुसार त्यात थोडे फार बदल होतात, इतकेच. विवाहापूर्वी जवळपास १६ दिवस लहान-मोठे विधी सुरू असतात. 

घराण्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी, मानपान मिळविण्यासाठी, नातेवाईकांना खूश करण्यासाठी विवाहांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. बडे राजकारणी, व्यावसायिक, राजकारणी, उद्योजक यांच्याकडे बक्कळ पैसा असल्याने त्यांना अशी उधळपट्टी शक्य असतेही, पण ज्यांची परिस्थिती बेताची, मध्यम आहे अशा कुटुंबांनाही असाच डामडौलात विवाह करण्याचा दबाव असतो. ही कुटुंबेही लग्नावर मोठा खर्च करतात. त्यासाठी सावकारांकडून, बँकांकडून कर्जं काढतात, प्रसंगी जमिनी विकून पैसे उभे करतात. त्यातून टोलेजंग विवाह साजरे करतात. झालेल्या कर्जाचा बोजा उतरविण्यासाठी ही गरीब कुटुंबे आयुष्यभर काबाडकष्ट करत राहतात. समाजाचा, नातेवाईकांचा दबाव एवढा असतो की अशी डामडौलात लग्नं केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहत नाही. 

या सर्व सोपस्कारांना फाटा देऊन लाखोंचा खर्च टाळायचा असेल तर सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करणे हा अत्यंत चांगला पर्याय समोर येत आहे. यासाठी पैसाही लागत नाही आणि वेळही वाचतो. अनेक जातींचे, धर्माचे विवाह एकत्र होत असल्याने सामाजिक एकोपा वाढायला मदत होते. 

लग्नात होणारी उधळपट्टी बघून शिर्डीचे कैलास गोविंदराव कोते उर्फ कैलासबापू हा तरुण बेचैन झाला. त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, असं त्यांच्या मनाने घेतलं. विजयराव कोते, उत्तमराव कोते, भगिरथ होन, आप्पासाहेब कोते, शांताराम मिराणे, ज्ञानेश्वर गोंदकर या जिवाभावाच्या मित्रांशी त्यांनी चर्चा केली. सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे हा उपक्रम समोर आला. त्यासाठी कैलासबापूंच्या नेतृत्वाखाली श्री साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सर्व मित्रांनी वर्गणी करून फंड उभारला. विवाहासाठी फक्त सव्वा रुपया इतकेच नोंदणी शुल्क घ्यायचे, उर्वरित खर्च सर्वांनी मिळून करायचा असेही ठरले. २००२ मध्ये शिर्डीत अक्षय्यतृतीयेला पहिला सामुदायिक विवाह सोहळा झाला. २५ जोडप्यांचे लग्न झाले. 'सव्वा रुपयात लग्न लावून देऊ, बाकी खर्च आम्ही करू,' असा प्रचार नगर जिल्ह्यात तसेच नाशिक, औरंगाबाद परिसरातही करण्यात आला. त्यामुळे या सामुदायिक विवाहाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत गेला. अखंडपणे सुरू असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाहांमध्ये आतापर्यंत १३५० जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. यंदा ५५ जोडप्यांनी लग्नासाठी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओरिसा, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमधूनही लग्न करण्यासाठी जोडपी शिर्डीला येतात. 

सामुदायिक विवाहाच्या तयारीसाठी एक हजार एक जणांचा मित्रपरिवार महिनाभर राबतो. आपले घरचे लग्न समजून हा सोहळा साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले जातात. सात एकर जागेवर हा विवाहसोहळा सायंकाळी होतो. तब्बल २५ हजार लोकांची उपस्थिती असते. त्यासाठी भलेमोठे स्टेज उभारले जाते. संत महंतांबरोबरच बडे राजकीय नेतेही आवर्जून उपस्थिती लावतात. 

शिर्डीच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू-वरांसाठी आयोजकांतर्फे भेटवस्तू दिल्या जातात. वधूसाठी एक ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, पैठणी साडी, चांदीचे जोडवे, संसारोपयोगी भांड्यांचा सेट आणि वरासाठी पोशाख भेट दिला जातो. मुलीचे कन्यादान स्वतः आयोजक कैलासबापू व त्यांच्या पत्नी सुमित्राताई करतात. साईसमाधी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर वरांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीसाठी उंट, घोडे, मोटारी यांचा वापर केला जातो. आतषबाजी केली जाते. शिर्डीत शहरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. 

वधू-वरांकडील वऱ्हाडी मंडळी, स्थानिक ग्रामस्थ, आयोजक, मित्रपरिवाराचे नातेवाईक, स्वयंसेवक यांना लग्नाच्या दिवशी जेवण दिले जाते. सुमारे २५ हजारांची गर्दी होत असल्याने सकाळी १० पासून सायंकाळी साडे पाच पर्यंत जेवणाच्या पंक्ती सुरू असतात. तीन हजार वऱ्हाडी लोकांना आयोजकांतर्फे वेगळे जेवणही दिले जाते. त्यासाठी आंबा रस, मांडे, भजी, दालबट्टी असा शाही मेनू असतो. खास कोकणातून हापूस आंबे मागविले जातात. 

सबका मालिक एक, श्रध्दा व सबुरी हा साईबाबांचा संदेश देतानाच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी 'स्त्री जन्माचे स्वागत करा' हा संदेशही दिला जातो. 

मुलामुलींच्या लग्नासाठी गरिबांना कर्ज काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याचे जाणीवपूर्वक आयोजन सुरू केल्याचे आयोजक कैलासबापू कोते सांगतात. यंदाच्या वर्षापासून स्त्री जन्माचे स्वागत करण्याच्या उद्देशाने या विवाह सोहळ्यात लग्न लावणाऱ्या जोडप्यांच्या पोटी जन्मास आलेल्या मुलीचे नावे १० हजार रुपयांची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे. या पैशातून या मुलीच्या शिक्षणाला हातभार लागावा, अशी अपेक्षा असल्याचे कोते यांनी सांगितले. 

जात, धर्म, पंथ विसरून लोकांना हजारोंच्या संख्येने एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा वेगळा मार्ग आहे. परंपरेची बूज राखून आधुनिकतेच्या मार्गाने जाण्यासाठी सामुदायिक विवाह हा केवळ उपक्रम राहू नये तर ती एक चळवळ झाली पाहिजे. अशा संस्था, व्यक्ती पुढे यायला हव्यात. सरकारनेही यासाठी पुढाकार घ्यायला हवा. सामुदायिक विवाहांच्या उपक्रमांना, त्यांचे आयोजन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सरकारने पाठबळ दिले तर ही चळवळ आणखी बळकट होईल.

अजून लग्नपत्रिकेंच्या कवितांसाठी येथे या 

marathi majkur marathi lagna invitation marathi charolya lagna lagna patrika marathi format lagna patrika kavita in marathi lagna patrika samples in marathi lagna patrika format in marathi pdf lagna patrika format in hindi marathi lagna charoli lagna patrika samples marathi lagna patrika wordings in marathi lagna patrika design marathi lagna kavita lagna patrika designs marathi kavita lagna lagna patrika format in marathi marathi kavita on lagna lagna patrika marathi matter lagna patrika in hindi lagna patrika matter in hindi marathi vivah patrika marathi patrika majkur marathi patrika matter marathi patrika marathi patrika format marathi patrika kavita marathi lagna geet marathi patrika invitation matter vivah patrika matter in marathi patrika in marathi vivah patrika sample patrika marathi patrika majkur lagna in marathi marathi vivah kavita vivah patrika lagna marathi vivah patrika format in hindi marriage patrika format in marathi marathi wedding card wordings marathi wedding matter lagna marathi kavita www.marathi lagna patrika.com marriage invitation wordings in marathi marriage card matter in marathi marathi wedding cards marriage card format in marathi marathi wedding card format marathi language lagna kavita in marathi marriage patrika designs मराठी लग्न marathi marriage card marathi poem on marriage lagna kavita vivah patrika matter in hindi marathi marriage card matter marathi wedding card wedding cards in marathi wording marathi marriage card format vivah patrika in hindi marathi wedding poem marathi marriage invitation wordings marriage invitation in marathi marriage card in marathi marathi invitation format marathi invitation wordings marriage patrika wedding patrika marathi majkur marathi poem in marathi patrika design marathi poem in marathi language poem in marathi patrika for marriage free marathi poem patrika designs marathi kavita on marriage poem in marathi language wedding card matter in marathi language wedding matter in marathi wedding card format in marathi marathi wedding card matter in marathi marathi wedding card format marathi wedding card matter marathi invitation matter wedding invitation matter in marathi wedding card marathi wedding invitation format in marathi marathi wedding card designs invitation in marathi invitation for the wedding marathi invitation marathi marriage quotes wedding patrika design marathi marriage biodata marriage wedding cards matter english marriage card matter marriage card format marriage card wordings marriage card samples best marriage invitation wordings english marriage invitation wordings marriage invitation wordings in english marathi biodata for marriage design card wedding wedding cards in marathi design of wedding marathi kavita for marriage wedding cards design samples wedding invitation in marathi card for marriage nice poem in marathi poem of marathi best poem in marathi invitation card of marriage vivah card matter in hindi marathi marriage kavita card of marriage marathi wedding kavita marriage lagna

No comments:

Post a Comment