Harmonium Information in Marathi
harmonium information in marathi |
harmonium information in marathi |
harmonium information in marathi |
या मनस्वी कलावंताचे नाव आहे, साबण्णा भीमण्णा बुरूड. संगीत सेवेसाठी गेली साठ वर्षे त्यांचे हात राबत आहेत. वयाच्या पंच्याहत्तरीमुळे अमृतमहोत्सव, तर संगीतसेवेच्या साठ वर्षांमुळे हीरकमहोत्सव असा दुग्धशर्करा योग साबण्णा यांच्या आयुष्यात जुळून आला आहे. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याच्या निमित्ताने ‘मटा’ने साबण्णा यांच्याशी संवाद साधला. साबण्णा आपल्या कुटुंबासह वडारवाडी या भागात राहतात. दुकान बंद केल्याने घरातूनच त्यांची वाद्यसेवा अखंडितपणे सुरू आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामधील बेळगेरी हे त्यांचे गाव. घरात बुरूड व्यवसाय. चार भावंडांमध्ये सर्वांत मोठे असल्याने कुटुंबाची जबाबदारी साबण्णा यांच्यावर आली. एका हार्मोनियम व्यावसायिकाबरोबर त्यांनी पुणे गाठले.
वाद्यांची दुरुस्ती शिकत शिकत ते मिरजकरांच्या दुकानात काम करू लागले. पुढे याच कारणासाठी त्यांनी मुंबई गाठली, प्रसंगी मिळेल ते खाऊन व रस्त्यावर मुक्काम करून दिवस काढले. कलेत पारंगत झाल्यानंतर ते पुन्हा पुण्याला आले. एच. व्ही. मेहेंदळे यांच्या दुकानात काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
sabanna burud harmonium maker |
‘हार्मोनियम तयार करणे ही आता आमची ओळख झाली आहे. बालगंधर्वांचे शिष्य रामभाऊ देशपांडे, अप्पा जळगावकर, पं. भीमसेन जोशी, सुधीर फडके, श्रीकांत देशपांडे, जयमाला शिलेदार अशा अनेक मातब्बर कलावंतांचा स्नेह या कलेमुळे मिळू शकला. त्यांच्या वाद्यांच्या माध्यमातून संगीत सेवा करता आली’...साबण्णा सांगत होते.... ‘पूर्वी पैसे कमी मिळायचे. या व्यवसायावरच मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न आदी गोष्टी पार पडल्या. आजही मला हे काम प्रचंड भावते. १८ तास मी काम करू शकतो.’ पडद्यामागचे कलाकार नेहमीच उपेक्षित राहतात. त्यांना समाजाकडून योग्य तो मानसन्मान मिळत नाही. पडद्यामागच्या कलाकारांशिवाय कोणतीच कला सिद्ध होऊ शकत नाही. पुण्यातील बहुतेक सर्व कलावंत साबण्णा यांच्याकडूनच आपल्या वाद्यांची दुरूस्ती करून घेतात, हे विशेष.
अमेरिकेची संधी नाकारली
‘संगीतकार वसंत देसाई यांच्या संचासाठी इलेक्ट्रॉनिक गिटार बनवून द्यायची संधी एकदा मिळाली होती. बाबूजी मला त्यासाठी अमेरिकेला चल म्हणाले होते; पण ती भाषा आपल्याला येत नाही तर तिकडे जाऊन काय करायचे,’ असे सांगून नकार दिल्याची आठवण साबण्णा यांनी जागवली.
Harmonium Information in Marathi. Indian Musical Instruments Harmonium (Peti) Info – हार्मोनियम माहिती. हार्मोनियम हे एक कीबोर्ड संवादिनी (हार्मोनियम/बाजाची पेटी/पेटी) हिचा शोध पॅरीस हारमोनियम (Harmonium) एक संगीत वाद्य यंत्र है जिसमें वायु प्रवाह किया जाता है और भिन्न चपटी स्वर पटलों को दबाने से हार्मोनियम या मूळ पाश्चात्य वाद्याचे ते भारतीय नाव आहे हार्मोनियम: बाजाची पेटी, हार्मोनियम अथवा संवादिनी हे नाव आहेत.बाजाच्या पट्ट्या : काळ्या व पांढऱ्या
No comments:
Post a Comment